तुम्ही रिअल इस्टेट किंवा इतर कोणतीही मोठी मालमत्ता 50 लाख रुपयांच्या वर खरेदी करत असाल तर त्यावर टीडीएस (TDS) कापून घेणे आवश्यक आहे. आयकर (Income Tax) नियमानुसार विक्रीच्या एकूण रकमेपैकी 1 टक्के रक्कम टीडीएस म्हणून कापली पाहिजे. हे पैसे आयकर विभागात जमा करावेत. हे काम पूर्णपणे ऑनलाइन पद्धीतीने असू शकते, त्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागेल.
या कामासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तेथे दिलेल्या सूचनांचे पालन करून, तुम्ही TDS संबंधित सर्व नियम पाहू शकता आणि त्यानुसार TDS जमा देखील करू शकता.
टीडीएस कापण्याची आणि जमा करण्याची पद्धत
मालमत्ता खरेदीदार ऑनलाइन टीडीएस व्यवहार करू शकतो. त्यासाठी त्याला www.tin-nsdl.com या लिंकवर जावे लागेल. खरेदी आणि टीडीएसची सर्व माहिती या वेबसाइटवर दिली आहे. व्यवहाराचे सर्व तपशील दिल्यानंतर खरेदीदाराकडे दोन पर्याय असतात.
1) ई-टॅक्स पर्यायाद्वारे टीडीएसचे ऑनलाइन पेमेंट
2) नेट बँकिंगद्वारे किंवा कोणत्याही अधिकृत बँकेच्या शाखेला भेट देऊन कर भरणे
फॉर्म 26QB ची मदत घ्या
आयकर वेबसाइटवर जा आणि services टॅबवर क्लिक करा. येथे तुम्हाला मालमत्तेच्या विक्रीवर टीडीएस लिहिलेला दिसेल ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. यानंतर मालमत्तेवर TDS भरण्यासाठी ऑनलाइन फॉर्मवर क्लिक करा (फॉर्म 26QB). यामध्ये एक फॉर्म दिसेल ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला मालमत्ता, विक्री, खरेदीदार आणि विक्रेत्याचा पॅन क्रमांक इत्यादी माहिती भरावी लागेल.
फॉर्म 26QB भरला नाही तर काय होईल
ज्या महिन्यात TDS कापला गेला आहे त्या महिन्याच्या अखेरीपासून 7 दिवसांच्या आत खरेदीदाराने फॉर्म 26QB ऑनलाइन न भरल्यास, खरेदीदाराला काही रक्कम दंड म्हणून भरावी लागेल.
मालमत्तेच्या खरेदीदाराला टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर (TAN) मिळणे आवश्यक नाही त्यचबरोबर खरेदीदार आणि विक्रेत्याचा पॅन आवश्यक आहे.
विक्रेत्याचा पॅन क्रमांक घेणे आणि मूळ पॅनसह त्याची पडताळणी करणे महत्वाचे आहे जेणेकरून नंतर कोणतीही चूक होणार नाही.
ऑनलाइन फॉर्म काळजीपूर्वक भरा कारण दुरुस्तीसाठी कोणतीही ऑनलाइन प्रणाली नाही. यामध्ये छोट्यातल्या छोट्या दुरुस्तीसाठी आयकर विभागाला चूक दुरूस्तीसाठी विनंती पाठवावी लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.