...ऑफिसमध्ये अफेअर सुरू असेल तर 'या' कंपनीत गमवावी लागणार नोकरी

अनेकवेळा कंपन्या नोकरी देण्यासाठी वेगवेगळ्या अटी ठेवतात. पण चीनच्या एका कंपनीनेही अशाच काही अटी ठेवल्या आहेत ज्या वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल
jobs
jobsDainik Gomantak
Published on
Updated on

अनेक कंपन्या नोकरी देण्यासाठी वेगवेगळ्या अटी आणि नियम ठेवत असतात. पण एका चिनी कंपनीने येथील नोकऱ्यांसाठी विचित्र नियम घोषित केला आहे. कंपनीच्या धोरणानुसार घटस्फोट घेतलेल्या आणि ऑफिसमध्ये कोणाशी अफेअर सुरू असेल तर नोकरी मिळणार नाही.

कंपनीने स्पष्टपणे सांगितले की, जर त्या व्यक्तीला या कंपनीत नोकरी हवी असेल तर त्याच्या कुटुंबाशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहणे ही पहिली अट आहे.

चीनच्या (China) झेजियांगच्या या कंपनीने हा नियम सध्याच्या कर्मचाऱ्यांनाही लागू असल्याचे म्हटले आहे. विवाहबाह्य संबंधांना प्रतिबंध करणाऱ्या या नियमांनुसार, कोणत्याही विवाहित कर्मचाऱ्याला विवाहबाह्य संबंध ठेवण्याची परवानगी नाही.

कंपनीला अशी कोणाचीही माहिती मिळाल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि त्याची नोकरीही जाऊ शकते. तसेच, त्या व्यक्तीला या कंपनीत बॅन केले जाऊ शकते.

jobs
Father's Day Special: फादर्स डे निमित्त वडिलांना द्या अशा पध्दतीने आर्थिक आधार
  • नियम मोडल्यास गमवावी लागेल नोकरी

कंपनीचे अंतर्गत व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशीही एकनिष्ठ राहणे आवश्यक आहे असे नियम असलेल्या या नियमावलीमध्ये म्हटले आहे. 

पती-पत्नीमध्ये प्रेम असावे. सर्व विवाहित कर्मचारी कुटुंबाच्या (Family) सुरक्षिततेवर आणि कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अतिरिक्त वैवाहिक अधिकारी यांसारख्या गोष्टी टाळतात. तसेच, कोणत्याही कर्मचाऱ्याने घटस्फोट घेऊ नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com