TCS Dividend: शेअरधारकांचे बल्ले-बल्ले, कंपनीने जाहीर केला Dividend; जाणून घ्या

TCS Q2 Results Update: शेअरधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
TCS
TCS Dainik Gomantak
Published on
Updated on

TCS Dividend: शेअरधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्याकडे देशातील आघाडीची IT कंपनी TCS चे शेअर्स असतील तर आता कंपनीने शेअरधारकांसाठी लाभांश जाहीर केला आहे. यासह, तिमाही निकाल (TCS Q2 Results) देखील प्रसिद्ध झाले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चा निव्वळ नफा वार्षिक 8.4 टक्क्यांनी वाढून 10,431 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

उत्पन्नात 18% वाढ

टाटा समूहाच्या (Tata Group) या कंपनीने सोमवारी सांगितले की, 'समीक्षाधीन तिमाहीत सेवांमधून मिळालेले एकूण उत्पन्न 18 टक्क्यांनी वाढून 54,309 कोटी रुपये झाले आहे. एका वर्षापूर्वी 2021-22 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 46,867 कोटी रुपये होते तर निव्वळ नफा 9,624 कोटी रुपये होता. तथापि, TCS चे ऑपरेटिंग मार्जिन 1.24 टक्क्यांनी घसरुन 24 टक्क्यांवर आले.'

TCS
TCS फायद्यात, 'सेन्सेक्स'च्या या कंपन्यांचे बाजारी भांडवल 1.29 लाख कोटीवर

लाभांश प्रति शेअर 8 रुपये असेल

कंपनीने आपल्या भागधारकांना लाभांश देण्याची घोषणाही केली आहे. कंपनी तिच्या भागधारकांना प्रति शेअर 8 रुपये अंतरिम लाभांश देईल.

TCS
TCS Hiring Plan: देशातील सर्वात मोठी कंपनी करणार 40 हजार फ्रेशर्सची भरती

9,840 लोकांना नोकऱ्या मिळाल्या

सप्टेंबर तिमाहीत कंपनीने निव्वळ 9,840 कर्मचारी (Employees) नियुक्त केले आहेत. यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या 6.16 लाख झाली आहे. कंपनी या क्षेत्रातील सर्वाधिक रोजगार देणारी ठरली आहे. TCS चे समभाग BSE वर 1.84 टक्क्यांनी वाढून 3,121.20 रुपयांवर बंद झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com