PM Kisan Scheme: शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर आता केंद्र सरकारने तुम्हाला एक मोठी भेट दिली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना आता दुप्पट लाभ मिळणार आहे. यापूर्वी 2000 रुपये सरकारकडून शेतकऱ्यांना दिले जात होते, परंतु यावेळी 2000 ऐवजी तुम्हाला पूर्ण 4000 रुपये मिळतील.
तुम्हीही शेतकरी (Farmer) असाल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा दुहेरी लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत 13 हप्त्यांचे पैसे सरकारने वर्ग केले आहेत.
दरम्यान, अनेक शेतकरी त्यांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करु शकले नाहीत, ज्यामुळे त्या शेतकऱ्यांना 13 व्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत, परंतु आता मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी पडताळणी केली आहे.
आता 14 व्या हप्त्यात सरकार 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये शेतकऱ्यांना हस्तांतरित करणार आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांना तेराव्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत. त्या शेतकऱ्यांना तेराव्या हप्त्याचे पैसेही मिळतील.
केंद्र सरकारकडून आतापर्यंत 13 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. सध्या शेतकरी चौदाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या शेतकऱ्यांना 13 व्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत, त्यांना 13 व्या आणि 14 व्या हप्त्याचे पैसे मिळतील.
पीएम किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान रिलीज होणार आहे. मागील वर्षी, याच कालावधीत मिळालेला 11 वा हप्ता 31 मे 2022 रोजी हस्तांतरित करण्यात आला होता. असे मानले जाते की, यावेळी 14 वा हप्ता जुलै महिन्यात खात्यात येऊ शकतो.
पीएम किसान (PM Kisan) योजनेतील वाढत्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर 1.86 अपात्र शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. आत्ता ही संख्या वाढण्याची शक्यता आहे, कारण सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदींचे सत्यापन अनिवार्य केले आहे.
जर 13 व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात अद्याप आले नाहीत, तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर मेल करुनही तुम्ही तुमची समस्या सांगू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.