DA Hike: 'या' भाजपशासित राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, 12 महिन्यांत दुसऱ्यांदा वाढला ​DA

CM Yogi Adityanath Government: उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने यूपीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) वाढवून मोठी भेट दिली आहे.
Money
MoneyDainik Gomantak
Published on
Updated on

CM Yogi Adityanath Government: उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने यूपीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) वाढवून मोठी भेट दिली आहे.

खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करुन हा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर उत्तर प्रदेशातील 16.35 लाख कर्मचारी आणि 11 लाख पेन्शनधारकांचे चेहरे फुलले आहेत.

सीएम आदित्यनाथ यांनी ट्विट केले की, 'उत्तर प्रदेश सरकारमध्ये कार्यरत 16.35 लाख राज्य कर्मचारी आणि 11 लाख पेन्शनधारकांच्या हितासाठी, 01 जानेवारी 2023 पासून राज्य सरकारकडून (Government) देय असलेला महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच्या दरात 4 टक्क्यांनी वाढ करुन, हे तो 38 टक्क्यांवरुन 42 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'

Money
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्‍यांची चांदी, मूळ वेतन 27000 पर्यंत वाढणार; 'या' तारखेपासून लागू होणार नियम!

तसेच, योगी आदित्यनाथ यांनी राज्य सरकारी कर्मचारी (Employees) आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता वाढीलाही मंजुरी दिली आहे. म्हणजेच, मे 2023 पासून राज्यातील 16 लाखांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळणार आहे. यासोबतच, या महिन्यापासून लोकांना पेन्शन मिळण्याचे प्रमाणही वाढणार आहे.

दुसरीकडे, उत्तर प्रदेशमध्ये एका वर्षाच्या कालावधीत दुसऱ्यांदा सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 2022 मध्ये ऑक्टोबर महिन्यात योगी आदित्यनाथ सरकारने महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली होती. बोनसही दिला होता.

Money
7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, DA बाबत आली मोठी बातमी; महागाई भत्ता 45...!

खरे तर, गेल्या वर्षी यूपी सरकारने राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिवाळी भेट दिली होती. विशेष म्हणजे, महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच्या दरात 4 टक्क्यांनी वाढही केली होती.

त्याचवेळी, सरकारने राज्य कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक/कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत 34 टक्क्यांवरुन 38 टक्क्यांपर्यंत वाढवली होती.

यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला 6,908 रुपये बोनस दिला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com