सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत वेलिंगकरांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन राज्यात राळ उठली आहे. ख्रिस्ती समुदायाने वेलिंगकरांच्या तात्काळ अटकेची मागणी केली आहे. यातच, गोवा काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेवून वेलिंगकरांच्या मुद्यावरुन सरकारवर निशाणा साधला. राज्यात निर्माण झालेली धार्मिक तेढ आटोक्यात आणण्यात सावंत सरकार अपयशी ठरले. त्यामुळे हे सरकार तात्काळ बरखास्त करण्यात यावे, अशी विनंती गोवा काँग्रेसकडून राज्यपालांना करण्यात आली आहे. तसेच, उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचीही मागणी यावेळी काँग्रेसकडून करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.