Vedanta Mining Dispute Dainik Gomantak
Video

Pilgao Farmers Protest : सलग तिसऱ्या दिवशी पिळगाव शेतकऱ्यांचे आंदोलन

Vedanta Mining Dispute: मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. मागण्या मान्य केल्या, तर कंपनीला सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत, असे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: पिळगावमधील शेतकऱ्यांनी तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. या आंदोलनामुळे तिसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंदच होती. ‘वेदांता’च्या खाणीवरून खनिज वाहतूक धावले नाहीत. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. मागण्या मान्य केल्या, तर कंपनीला सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत, असे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

आपल्या मागण्या पुढे करुन पिळगावमधील शेतकरी आणि कंपनीने कपात केलेल्या कामगारांनी गेल्या बुधवारपासून आंदोलन सुरू केले आहे. सारमानस परिसरात खनिज वाहतुकीच्या खाणीवरील रस्त्यावर लाकडी कुंपण आणि झोपडी उभारून ‘रस्ता बंद’ केला आहे. शेतकरी आणि वंचित कामगार मिळून ५० हून अधिक ग्रामस्थांनी आजही आंदोलन केले. आंदोलनावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये. यासाठी पोलिस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT