Lawyers Car Smashed at Margao Dainik Gomantak
Video

Margao Crime: मडगावात वकिलाची गाडी फोडली! माजी उपनगराध्‍यक्षांच्‍या पतीविरोधात तक्रार; प्रकरणात हात नसल्याचा संशयिताचा दावा

Margao Crime News: माजी उपनगराध्‍यक्ष दीपाली सावळ यांचे पती दिगंबर सावळ हे पुन्‍हा एकदा अडचणीत आले आहेत. एका बेकायदा घराची पाहणी करण्‍यासाठी गेले असता, सावळ आणि अन्‍य दोघांनी आपल्‍यावर हल्‍ला करून आपल्‍या गाडीची मोडतोड केली अशा आशयाची तक्रार महिला वकील लियोना बार्रेटो यांनी मडगाव पोलिसात दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Lawyers Car Smashed at Margao

मडगाव: यापूर्वी एका माणसावर दगड उचलून मारण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याच्‍या आरोपामुळे वादग्रस्‍त ठरलेले माजी उपनगराध्‍यक्ष दीपाली सावळ यांचे पती दिगंबर सावळ हे पुन्‍हा एकदा अडचणीत आले आहेत. एका बेकायदा घराची पाहणी करण्‍यासाठी गेले असता, सावळ आणि अन्‍य दोघांनी आपल्‍यावर हल्‍ला करून आपल्‍या गाडीची मोडतोड केली अशा आशयाची तक्रार महिला वकील लियोना बार्रेटो यांनी मडगाव पोलिसात दिली आहे.

ही घटना काल बुधवारी घडली. सावळ यांचे कालकोंडा-मडगाव येथील बांधकाम बेकायदा असल्‍याचा आरोप करण्‍यात आला असून यासंबंधी तक्रार केल्‍यानंतर काल या बांधकामाची एसजीपीडीएने पाहणी ठेवली होती. यावेळी तक्रारदाराच्‍यावतीने ॲड. बार्रेटो तिथे गेल्‍या होत्‍या. त्‍यावेळी काही माणसे हातात लोखंडी दांडे घेऊन तिथे उपस्‍थित होते. त्‍यांनी आपल्‍याला धमक्‍या देण्‍यास सुरुवात केली. त्‍यानंतर त्‍यांनी आपली गाडी फोडली असे या तक्रारीत म्‍हटले आहे.

ॲड. बार्रेटो यांनी पत्रकारांशी बोलताना, आपण मडगावचे पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्‍याकडे तक्रार दिली असून त्‍यांनी जर या प्रकरणात गुन्‍हा नोंद न केल्‍यास आपण न्‍यायालयात दाद मागू आणि उपनिरीक्षक नाईक यांनाही त्‍यात प्रतिवादी करू असा इशारा दिला.

गाडी तोडफोड प्रकरणात माझा हात नाही; सावळ

अॅड. लियोना बार्रेटो यांची गाडीच्या तोडफोड प्रकरणात आपला हात नाही. बार्रेटो यांनी आपल्‍या विरोधात खोटी तक्रार दाखल केली आहे, असा खुलासा करीत दिगंबर सावळ यांनी गुरुवारी त्‍या वकिलाच्‍या विरोधात आपली बदनामी केल्‍याची तक्रार दिली आहे.

बुधवारी ॲड. बार्रेटो यांनी त्‍यांच्‍या विरोधात मडगाव पोलिसांत तक्रार दिली होती. सावळ यांनी बांधलेले घर बेकायदा असल्‍याची तक्रार विजय मास्‍कारेन्‍हास या व्‍यक्‍तीने एसजीपीडीएत केली होती. बुधवारी एसजीपीडीएने या घराची पाहणी करण्‍यासाठी तारीख दिली होती. बार्रेटो या मास्‍कारेन्‍हास यांच्‍या वकील म्‍हणून तिथे आल्‍या असता सावळ व इतरांनी आपल्‍याला धमक्‍या देत आपली गाडीची तोडफोड केली अशी तक्रार मडगाव पोलिसात त्‍यांनी दिली आहे.

दरम्‍यान, सावळ गुरुवारी कालकोंडा येथील स्थानिकांना घेऊन मडगाव पोलिस स्‍थानकावर आले व त्‍यांनी आपली तक्रार दाखल केली. घराची तपासणी करण्‍यासाठी एसजीपीडीएचे अधिकारी आले होते. त्‍यावेळी मास्‍कारेन्‍हस आपल्‍या वकिलाला घेऊन आले होते. त्‍यावेळी आपण कुणालाही अडविलेले नाही, असा दावा केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women's T20 Cricket: गोव्याच्या पोरी पुन्हा हारल्या! ओडिशानं 10 विकेट्सने नोंदवला दणदणीत विजय; माधुरी-सरीता जोडी चमकली

Goa Live Updates: APAAR कार्ड विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर; कुठलीही भीती बाळगण्याचं कारण नाही: शैलेश झिंगाडे

गोव्यातील बेकायदा बांधकामे, सरकारी अनास्था आणि राजकीय आशीर्वादाचा खेळ

Goa Cyber Crime: फॉरेक्स ट्रेडिंगच्या बहाण्याने 35 लाखांना गंडा लावणारा केरळचा तरुण गजाआड; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

Yuri Alemao: एस्कॉर्ट संकेतस्थळांवरून आलेमाव यांची सरकारवर घणाघाती टीका! पोलिसांनी फेटाळला आरोप

SCROLL FOR NEXT