Ponda Tree Collapsed 
Video

Ponda Tree Collapsed: कुर्टी-फोंड्यात चिंचेचे झाड कोसळले, 3 वाहनांचे नुकसान

Tree collapsed: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून, त्याचे परिणाम विविध भागांमध्ये दिसून येत आहेत.

Sameer Amunekar

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून, त्याचे परिणाम विविध भागांमध्ये दिसून येत आहेत. आज कुर्टी-फोंडा परिसरात चिंचेचे झाड तीन वाहनांवर कोसळल्याचं समोर आलं आहे. तिन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. झाड कोसळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, झाड हटवण्याचे काम सुरू आहे.

या भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे झाडांची मुळे सैल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि जुन्या, मोठ्या झाडांपासून अंतर ठेवण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला कधीपर्यंत राखी बांधता येईल? भद्रकाळ टाळा, नेमका शुभमुहूर्त जाणून घ्या

Goa Assembly Live: मंत्री बाबूश मोन्सेरात आणि गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळच्या निर्णयाचे डॉ. देविया राणे यांनी केले कौतुक

गोव्यात बेकायदा बांधकामांना बसणार चाप; मंत्री माविन गुदिन्हो यांची कायदा करण्याची घोषणा

IND vs ENG: ओव्हल टेस्टवर पावसाचं सावट? हवामान बिघडवणार खेळ? जाणून पाचही दिवसांचा वेदर रिपोर्ट

Goa To London Flight: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! गोवा ते लंडन विमानसेवा सप्टेंबर अखेरपर्यंत पुन्हा सुरु होणार; पर्यटनमंत्री खवंटेंची माहिती

SCROLL FOR NEXT