Ponda Fire Incident Dainik Gomantak
Video

Ponda Fire News: तिस्क-फोंडा येथे आगीचे थैमान! चष्म्याच्या दुकानाचे मोठे नुकसान

Tisca Ponda Fire News: आगीचे कारण निश्‍चित समजू शकले नसले तरी विजेच्या उच्च दाबामुळे ही आग लागली असावी असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.

Sameer Panditrao

Tisca Ponda Fire Incident

फोंडा: तिस्क-फोंडा येथील कॉमर्स ट्रेड सेंटर इमारतीतील ग्लोबल व्हिजन या चष्म्याच्या दुकानाला आज (शनिवारी) सकाळी १० वा.च्या सुमारास अचानक आग लागल्याने गोंधळ उडाला. आगीचे कारण निश्‍चित समजू शकले नसले तरी विजेच्या उच्च दाबामुळे ही आग लागली असावी असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.

आग लागल्याचे दिसताच त्वरित फोंडा अग्निशामक दलाला कळविल्यानंतर जवानांनी पाण्याच्या बंबासह घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. विशेष म्हणजे ही आग रात्रीच्यावेळी लागली असती तर मोठे नुकसान झाले असते. या दुकानाच्या बाजूला कपड्याचे तसेच इतर साहित्याची दुकाने असल्याने आगीचा फटका इतरांनाही बसला असता, सुदैवाने आग आटोक्यात आल्याने अनुचित प्रसंग टळला; पण ग्लोबल व्हिजन या दुकानाचे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

SCROLL FOR NEXT