Goa Chhath Puja
वास्को: बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, पूर्वी उत्तर प्रदेश आदी भागातील हिंदू समाजाचे छठ पूजा हे महत्त्वाचे व्रत आहे. संतती प्राप्ती व दीर्घ आयुष्यासाठी महिला हे व्रत करतात. यानिमित्त सूर्यदेवाची उपासना केली जाते. गेल्या काही वर्षांत गोव्यातही छठपूजा होऊ लागली आहे. गोव्यात वास्तव्यास असलेले उत्तर भारतीय यानिमित्त विविध समुद्र किनारे वा नदी किनारी एकत्र येतात व विधीनुसार छठपूजा करून मावळत्या सूर्याचे दर्शन घेउन उपासनेला सुरवात करतात व दुसऱ्या दिवशी किनाऱ्यावर येऊन उगवत्या सूर्याचे दर्शन घेउन उपवास सोडतात. गुरुवारी संध्याकाळी राज्यातील अनेक समुद्र किनारे तसेच काही नदी काठही छठ पूजेनिमित्त दुपारपासून गजबजले होते.
डिचोली येथे ही छठ पूजा उत्साहाने साजरी करण्यात आली. लोकांनी भक्तीभावाने यात सहभाग घेतला. पारंपारिक पद्धतीने सूर्याची आराधना करण्यात आली.
वास्कोतील बायणा, मिरामार आदी किनाऱ्यांवर मोठी गर्दी उसळली होती. बायणा समुद्र किनाऱ्यावरील छठपुजेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनी छठ पूजेत भाग घेत सूर्यदेवतेची आराधना केली. यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, नगरसेविका शमी साळकर, चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव आदी उपस्थित होते.फोंड्यातही छठपुजेनिमित्त उत्तर भारतीय एकत्र आले होते. नागझर-कुर्टी येथील महादेव मंदिराच्या प्रांगणात छठ पूजा करून सूर्याची आराधना करण्यात आली. कृषीमंत्री रवी नाईक यांनीही यात भाग घेतला व उत्तर भारतीय नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी, सरपंच अभिजित गावडे, पंच बाबू च्यारी, महादेव देवस्थानचे अध्यक्ष उल्हास नाईक, छठपूजा महोत्सव आयोजन समितीचे उपाध्यक्ष चंद्रकिशोर झा, सुजित सिंग आदी उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.