tHE BIG BULL
tHE BIG BULL 
मनोरंजन

अभिषेक बच्चन येतोय 'बीग बुल'च्या भूमिकेत; ट्रेलरने घातला धुमाकूळ

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्या आगामी 'द बिग बुल' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. आणि या चित्रपटाच्या स्टोरीमुळे प्रेक्षकांच्या उत्साहात आणखी भर पडली आहे. कारण या चित्रपटात अभिषेक बच्चन घोटाळेबाज हर्षद मेहताच्या भूमिकेत दिसणार आहेत. व या चित्रपटात अभिषेक बच्चनने केलेल्या अभिनयाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळेल अशी शक्यता चित्रपटाचा ट्रेलर पाहून वर्तविली जात आहे. (The trailer of Abhishek Bachchans upcoming film The Big Bull has just been released)

अभिषेक बच्चनच्या अभिनयाव्यतिरिक्त या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये प्रसिद्ध यू-ट्यूबर कॅरीमीनाटीच्या यलगार या गाण्याचा सुद्धा टच देण्यात आल्याचे पाहायला मिळते. ट्रेलर लाँच होताच इंटरनेटवर या व्हिडिओने काही वेळातच एक लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले आहेत. अभिषेक बच्चन सोबत या चित्रपटात इलियाना डिक्रूझ, निकिता दत्ता, राम कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अभिषेक बच्चनच्या अभिनयापासून ते चित्रपटातील त्यांच्या संवादांपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीतून चित्रपटासाठी केलेले अप्रतिम दिग्दर्शन दिसून येते. 

शेअर बाजार आणि त्यामागचे जग यावर या (The Big Bull) चित्रपटाची कथा आधारित आहे. ट्रेलरच्या शेवटच्या भागात अभिषेक बच्चनचा 'मी भारताचा पहिला अब्जाधीश होईल' हा डायलॉग ट्रेलरला चार चांद लावून जातो. अभिषेक बच्चन व्यतिरिक्त इतर कलाकारांचा अभिनय सुद्धा कौतुकास्पद असल्याचे ट्रेलर वरून जाणवते. दरम्यान, लॉकडाऊन काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली 'स्कॅम 1992' ही वेब सिरीज सुद्धा प्रचंड गाजली होती. यामध्ये हर्षद मेहताच्या भूमिकेत असलेल्या प्रतीक गांधीची भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली होती. त्यामुळे आता अभिषेक बच्चन हा हर्षद मेहताच्या भूमिकेला किती न्याय देतो हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच पाहावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT