1947 मध्ये भारताची फाळणी ही संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी घटना होती. देशाला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे दोन भाग झाले. एकीकडे स्वातंत्र्याचा उत्सव आणि दुसरीकडे फाळणीनंतरच्या हिंसेच्या वेदना. या फाळणीच्या कडू आठवणी अजूनही लोकांच्या हृदयात आहे. या फाळणीने भारतापासून पाकिस्तानच वेगळे केले नाही तर इस्लाम आणि हिंदू धर्म समोरासमोर आणला. दोन्ही समाजातील लोकांनी या फाळणीत आपली वडिलोपार्जित जमीन आणि मालमत्ता गमावली, पण सर्वात मोठी शोकांतिका ही की या फाळणीत मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला. देशाच्या फाळणीसंदर्भात भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट तयार झाले आहेत, जे वेळोवेळी त्या फाळणीच्या वेदनेची अनुभूती देतात. जरी आज प्रत्येकजण स्वातंत्र्यदिन साजरा करत असेल, तरी फाळणीच्या वेदनांचाही विचार कित्येकाच्या डोक्यात फिरत असेल. भारतीय चित्रपटसृष्टीत बनवलेल्या 5 चित्रपटांबद्दल जाणून घेवूया ज्यात फाळणी दरम्यान प्रसंगाचे वर्णन केले आहे.
1. गरम हवा
दोन लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये बनलेला एमएस सथ्यूचा पहिला चित्रपट गरम हवा हा हिंदी चित्रपटसृष्टीचा ऐतिहासिक चित्रपट राहिला आहे. हा चित्रपट घर, मालकी, व्यवसाय, मानवता आणि राजकीय मूल्यांविषयी भाष्य करतो. इस्मत चुगताईच्या अप्रकाशित उर्दू लघुकथेवर आधारित हा चित्रपट भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित आहे. या चित्रपटात सलीम मिर्जाई हे उत्तर भारतीय मुस्लिम व्यापारी आहेत ज्यांना फाळणीनंतर पाकिस्तान न जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. गांधीजींच्या विचारांची एकदा तरी प्रचीती येईल आणि एक दिवस वातावरण शांत होईल असा त्यांचा विश्वास होता.
2. तमस
भीष्म साहनी यांच्या याच नावाच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. असे म्हटले जाते की ते 1947 च्या रावळपिंडी दंगलीची खरी कहाणी यांत सागण्यात आली आहे. गोविंद निहलानी निर्मित हा चित्रपट फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलींच्या कथा सांगते. काही तथाकथित लोकांमुळे दोन समाज कसे भिडले. यात भीष्म साहनी, ओम पुरी, सुरेखा सिक्री आणि एके हंगल सारखे दिग्गज कलाकार होते, ज्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. मात्र, त्यावेळी या सिरीजबद्दल खूप वाद झाले होते.
3. अर्थ
दीपा मेहता यांचा हा चित्रपट मुस्लिम तरुण आणि हिंदू आया यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी, 1947 मध्ये भारताच्या फाळणीपूर्वी लाहोरमधील परिस्थिती चित्रपट पडद्यावर दाखवण्यात आली होती. चित्रपटाची कथा फाळणीच्या वेळी निर्माण झालेल्या परिस्थितीकडे लक्ष वेधते. लोकांना या चित्रपटाची कथा खूप आवडली. शबाना आझमी, आमिर खान, नंदिता दास आणि राहुल खन्ना सारख्या कलाकारांनी या चित्रपटात महत्वाच्या भूमिका केल्या.
4 ट्रेन टू पाकिस्तान
कुशवंत सिंग यांच्या 'ट्रेन टू पाकिस्तान' या क्लासिक कादंबरीवर आधारित एक माहितीपट तयार करण्यात आला. जो भारत पाकिस्तानच्या नवीन सीमेजवळील एका प्रमुख रेल्वेमार्गावर असेलेल्या एका छोट्या पंजाबी शहर माॉनो माजरावर केंद्रित आहे. जेथे मुस्लिम लोकांची संख्या कमी आणि शिखांची जास्त आहे. फाळणीपूर्वी दोन्ही समाजाचे लोक एकत्र राहतात, मात्र फाळणीनंतर येथील परिस्थितीही देशाच्या इतर भागांप्रमाणे बदलते. जेव्हा पाकिस्तानातून पळून जाणाऱ्या शीखांचे मृतदेह घेऊन जाणारी ट्रेन मनो माजरा येथे येते, तेव्हा काही स्थानिक शीख पाकिस्तानात जाणाऱ्या मुस्लिम कुटुंबांनी भरलेल्या ट्रेनवर हल्ला करण्याचा विचार करतात. या लघूपटात एक समांतर प्रेमकथा देखील आहे, जी एक मुस्लिम मुलगी आणि तिचा दरोडेखोर प्रियकर यांच्या नात्यावर आधारित आहे.
5. पार्टीशन
गुरिंदर चड्डा यांचा हा चित्रपट स्वातंत्र्य आणि फाळणीच्या कथांवर आधारित आहे. त्यात खऱ्या घटनांचा उल्लेख करण्यात आल्याचे सांगितले जाते. हा चित्रपट 1945 च्या त्या काळातील आहे, जेव्हा ब्रिटिश सरकारने भारताला गुलामितून मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. स्वातंत्र्याच्या नावाखाली काही हिंदू-मुस्लिमांमध्ये उत्साह आणि काहींमध्ये निराशा या चित्रपटात दाखवण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.