Singer Abheejit on salman Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

"तो या गोष्टीच्या लायकीचाही नाही" शाहरुख नंतर आता सलमानवर गायक अभिजीत भडकला

गायक अभिजीत भट्टाचार्यने आता थेट बॉलीवूडचा भाईजान सलमान खानवर थेट टीका केली आहे.

Rahul sadolikar

Singer Abheejit on salman Khan : गेल्या काही दिवसांपासून गायक अभिजीत भट्टाचार्य चर्चेत आहे. शाहरुख खान खूप स्वार्थी आहे तो लोकांना वापरुन फेकून देतो अशी टीका केल्यानंतर आता अभिजीत बॉलीवूडचा भाईजान सलमान खानवर भडकला आहे. सलमान खानसंदर्भात अभिजीत नेमकं काय बोलला चला पाहुया.

अभिजीत चांगलाच भडकला

प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य त्याच्या उत्कृष्ट गाण्यांमुळे चर्चेत असतो. आतापर्यंत त्याने सुमारे 1000 चित्रपटांमध्ये 6000 हून अधिक गाणी गायली आहेत. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याने आपल्या जादुई आवाजातले अनेक म्युझिक व्हिडिओ बनवले आहेत. 

आपल्या वादग्रस्त विधानांमुळेही तो चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी या अभिनेत्याने शाहरुख खानवर निशाणा साधला होता. आता या गायकाने सलमान खानवर हल्ला चढवला आहे.

"सलमान द्वेषाच्याही लायकीचा नाही"

न्यूज 24 च्या वृत्तानुसार दिलेल्या मुलाखतीत सलमान खान त्याच्या द्वेषाच्या लायकीचाही नाही, असे अभिजीतने म्हटले आहे . सलमान खानबद्दल अजूनही त्याच्या मनात कटुता का आहे हेही अभिजीत सांगितले आहे.

अभिजीत म्हणाला

गायक अभिजीतने नुकतीच एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीदरम्यान त्याला विचारण्यात आले की, सलमान खानसोबत (salman khan abhijeet conflict) त्याचे नाते काय आहे? यावर उत्तर देताना सलमानशी असलेल्या मतभेदांबद्दल बोलताना म्हणाला, 'मला वाटत नाही की तो माझ्या द्वेषालासुद्धा पात्र आहे. मी सलमानला तिरस्काराच्या लायकाही मानत नाही.

सलमान देव नाही

 त्याला जे काही मिळाले आहे ते आशीर्वादाचा परिणाम आहे. तो केवळ प्रार्थनांवर धावत आहे. अभिजीत (singer abhijeet bhattacharya) पुढे म्हणाला, 'जर सलमान विचार करत असेल की तो देव झाला आहे, तर तसे नाही. तो देव नाही.

सलमानसोबत अभिजीतचा वाद

2015 मध्ये देखील अभिजीत भट्टाचार्यचा सलमान खानसोबत वाद झाला होता. त्यानंतर त्याने अभिनेत्याच्या विरोधात एक ट्विट केले, ज्यामुळे बराच गदारोळ झाला. आणि आता अभिजीत भट्टाचार्य यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. अभिजीत भट्टाचार्य यांचे म्हणणे आहे की, सलमानने आपल्याच देशातील गायकांऐवजी शत्रू देशाच्या गायकांना प्रोत्साहन दिले आणि त्यांना संधी दिली.

हिट अँड रन प्रकरणी अभिजीत...

अभिजीतने 2015 मध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणाबाबतही ट्विट केले होते. हिट अँड रन प्रकरणात एकाचा मृत्यू झाला होता तर 4 जण जखमी झाले होते. मात्र, या प्रकरणात पुराव्याअभावी मुंबई उच्च न्यायालयाने सुपरस्टारला दिलासा दिला. 

अभिजीतचं ते जुनं विधान

हिट अँड रनच्या या प्रकरणात अभिजीतने त्याच्या एका ट्विटमध्ये म्हटले होते की, फूटपाथ ही कोणाचीही झोपण्याची जागा नाही. आता त्याच्या याच ट्विटवर त्याला सलमानला सपोर्ट करण्याबाबत विचारण्यात आले. 

यावर गायक म्हणाला होता की, लोक असे कसे विचार करू शकतात की मी अशा माणसाला पाठिंबा देईन जो केवळ शत्रू देशाच्या (पाकिस्तान) कलाकारांना प्रोत्साहन देतो.

नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

Goa News: चर्चमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करा; आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांची मागणी

Goa Assmbly Live: लाटंबार्से औद्योगिक वसाहतीसाठी 38 कोटींचे वीज उपकेंद्र तातडीने उभारा; आमदार चंद्रकांत शेट्ये यांची सरकारकडे मागणी

Pregnancy: प्रेग्नेंसीमध्ये वाढता रक्तदाब ठरु शकतो जीवघेणा! आई आणि बाळासाठी धोक्याची घंटा; जाणून घ्या 'प्री-एक्लेम्पसिया'ची लक्षणे

Vivo चा 50MP कॅमेरा अन् 6,000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन लॉन्च, किंमत किती? फीचर्स काय? वाचा…

SCROLL FOR NEXT