Sidhu Moose Wala New Song
Sidhu Moose Wala New Song Dainik Gomantak
मनोरंजन

सिद्धू मूसेवालाचे SYL गाणे होणार आज रिलीज

दैनिक गोमन्तक

पंजाबचे सुप्रसिद्ध दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांचे नवे गाणे गुरुवारी सायंकाळी 6 वाजता प्रदर्शित होणार आहे. सिद्धू यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. मूसवालाचे नवीन गाणे एसवायएल (SYL) मुद्द्यावर आधारित आहे. तर हे गाणे त्याच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणार आहे. (Sidhu Musewala SYL song will be released today)

मुसेवाला यांची 29 मे रोजी हत्या करण्यात आली होती. पंजाबच्या सर्वोत्कृष्ट गायकांमध्ये सिद्धू यांचे नाव होते. त्यांच्या गाण्यांवरून वाद होत असले तरी त्यांची गाणी रसिकांच्या कायमच पसंतीस उतरली होती.

29 मे रोजी गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती, तर त्याच्या मृत्यूची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. मुलेवाला यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. सिद्धू मुसेवाला यांचे पूर्ण नाव शुभदीप सिंग सिद्धू असे आहे. मुसेवाला यांचा जन्म 11 जून 1993 रोजी मानसाच्या मुसा गावामध्ये झाला होता.

सिद्धू मुसेवाला यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी त्यांचे वडील बलकौर सिंह यांनी सिद्धूला त्यांच्या गाण्यांद्वारे जिवंत ठेवणार असल्याचे सांगितले होते. मूसवालाचे दोन व्हिडिओ, ज्यामध्ये तो बंदूक दाखवताना दिसून येत होता, ते गाने 2020 मध्ये व्हायरल झाले होता. एका व्हिडिओमध्ये तो AK-47 रायफलचे प्रशिक्षण घेताना दिसून येत होता.

जुलै 2020 मध्येच, मूसवालाने त्यांचे 'संजू' गाणे रिलीज केले होते, ज्यामध्ये त्याने त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरचे वर्णन 'सन्मानाचा बिल्ला' म्हणून केले होते.मुसेवाला यापूर्वी एकदा वादात सापडले होते जेव्हा त्यांनी त्यांच्या एका गाण्यात शीख इतिहासातील शिलालेख असलेल्या माई भागाबद्दल टिप्पणी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT