shilpa.jpg 
मनोरंजन

राज कुंद्राने शिल्पा शेट्टी सोबत टायटॅनिकचा व्हिडिओ केला शेअर

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीप्रमाणेच (Shilpa Shetty) तिचा नवरा राज कुंद्रादेखील (Raj Kundra) सोशल मीडियावर (Social media) खूप अ‍ॅक्टिव असतो. तो अनेकदा पत्नी शिल्पाबरोबर आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. आजकाल त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची जोडी जबरदस्त आहे आणि त्यांच्या चाहत्यांनाही त्यांची जोडी खूप आवडते. त्याचे प्रेम आणि मनोरंजनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अधिराज्य गाजवतात. नुकताच त्याने एक गमतीशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राज कुंद्रा आपली पत्नी शिल्पा शेट्टीसोबत टायटॅनिकला पोज देताना दिसत आहे.

हा व्हिडिओ राज कुंद्राने आपल्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राज आणि शिल्पा 'टायटॅनिक' (Titanic) चित्रपटाचे जॅक आणि रोज बनले आहेत. व्हिडिओमध्ये राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी प्रसिद्ध टायटॅनिकसाठी पोज देताना दिसत आहेत. व्हिडिओसह त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे 'टायटॅनिकची हॅट वेड पंजाबी जोडी परत आली आहे. तो पंजाबी असल्याचा पुरावा .. त्याने 'हिरा' समुद्रात फेकला! जट्ट दा प्यार गोरी' त्याचा हा मजेदार व्हिडिओ चाहत्यांना खूप पसंत येत आहे . त्याच्या या व्हिडिओवर चाहतेही वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट देखील करत आहेत. त्यांच्या एका चाहत्याने एक गमतीशीर कमेंट लिहली आहे, 'सर, तुम्ही दोघेही एखाद्या चित्रपटात कास्ट का होत नाहीत .. तुम्हीही प्रोडक्शन करायला हवे.  'पटियाला पेग दे इडली सांभर' असं या चित्रपटाचं नाव असेल.मला सांगा मी स्क्रिप्ट तयार करेल अशी गमतीशीर कमेंट त्यांच्या एका चाहत्याने केली आहे.  

दुसरीकडे, जर आपण शिल्पा शेट्टी यांच्या कामाबद्दल बोललो तर सध्या तिला 'सुपर डान्सर चॅप्टर 4' (super dancer chapter 4) मध्ये जज म्हणून पाहिले जात आहे. दुसरीकडे, 13 वर्षांनंतर शिल्पा शेट्टी शब्बीर खानच्या (Sabbir Khan) फिल्म 'निकम्मा' (Nikamma) मध्ये पुन्हा पडद्यावर दिसणार आहेत. या चित्रपटात अभिनेता अभिमन्यू दासानी (Abhimanyu Dasani) आणि शर्ली सेतियासुद्धा (Shirley Setia) त्यांच्यासोबत दिसणार आहे. यासोबतच ती 'हंगामा 2' (Hungama 2) मध्येही काम करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT