Priyanka Chopra and Nick Jonas enjoy Holi Dainik Gomantak
मनोरंजन

'देसी गर्ल'ने विदेशात पती निक सोबत केली रंगांची उधळण

दैनिक गोमन्तक

ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राच्या (Priyanka Chopra) घरी सध्या आनंदाचा वर्षाव होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत, अभिनेत्रीने तिच्या कुटुंबासोबत धमाकेदार होळी साजरी केली आहे. अभिनेत्री प्रियांकाने लॉस एंजेलिसमधील तिच्या सासरच्या घरी पती निक जोनाससोबत जोरदार होळी खेळली, तसेच अभिनेत्रीने तिच्या मजेदार होळीच्या काही झलकही सोशल मीडियावरती चाहत्यांसाठी शेअर केल्या आहेत. व्हिडिओमध्ये प्रियांका निकला रोमँटिक पद्धतीने रंग लावताना दिसत आहे तर प्रेमाने किस ही करताना दिसत आहे, तर निक जोनासही (Nick Jonas) आपल्या मित्रांसोबत आणि प्रियांका सोबत जोरदार होळी खेळताना दिसत आहे. निक प्रियांकाला रंग लावल्यानंतर, तो आपल्या भाऊ आणि वडिलांसोबत होळी खेळताना दिसला, संपूर्ण जोनास कुटुंबाने होळी खेळली आणि एकमेकांच्या प्रेमात रंग उजवताना दिसले. (Priyanka Chopra and Nick Jonas enjoy Holi with family in Los Angeles)

प्रियांकाने होळीला खूप धमाल केली

हा व्हिडिओ शेअर करताना प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले- 'काही खास आणि मजेदार क्षण माझ्या वाट्याला आले आहेत. ह्या वेळी जेव्हा जग भयभीत आहे, तेव्हा मी धन्य होते आहे. तुम्हा सर्वांना होळीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा. माझ्यासोबत देसी शैलीत होळी खेळल्याबद्दल माझे मित्र आणि माझ्या कुटुंबियांचे मनापासून आभार. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.

प्रियांकाने काही फोटोही सोशल मीडियावरती शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती निकला रंग लावताना, किस करताना दिसून येते आहे. ती तिच्या भाचींसोबत उत्सवी रंगावरती आधारित पुस्तक वाचताना दिसून येत आहे. अभिनेत्रीने जोनास कुटुंबातील होळीचे खास फोटोही शेअर केले आहेत.

व्हिडिओमध्ये निक जोनास खूप मस्ती करताना दिसून आहे. प्रियंका चोप्रा देखील तिच्या घराच्या लॉनमध्ये प्लॅस्टिकची पिचकारी घेऊन हातात लहान मुलांची बंदूक घेऊन फिरताना दिसत आहे आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना रंगाने आणि पाण्याने न्हाऊन निघताना दिसत आहे.

अलीकडेच प्रियंका चोप्राच्या घरात एका छोट्या पाहुण्यानेही पाऊल ठेवले आहे, त्यामुळे होळीचा आनंद द्विगुणित झाला. प्रियांका निकच्या होळीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत, तसेच त्यांना खूप पसंत केले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

Goa Today's News Live: दक्षिण गोव्यातील स्विगी डिलिव्हरी बॉईज संपावर

Pramod Sawant: दक्षिणेतील काही राज्य हिंदी समजून देखील घेण्याचा प्रयत्न करत नाहीत; गोवा मुख्यमंत्री

एक देश-एक निवडणूक! प्रत्यक्षात येण्याची वाट कमालीची खडतर; संपादकीय

गोव्याच्या लोकसंस्कृतीत 'घुमट वाद्याला' अनन्यसाधारण स्थान का आहे? चर्मवाद्यांच्या विशेष योगदानाबद्द्ल जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT