2010 मध्ये लव्ह सेक्स धोका हा एकता कपूरचा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्याआधीच निम्रित कौरने हा सिनेमा अर्ध्यातच सोडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निम्रित कौरने खूप बोल्ड सीन्समुळे 'लव्ह सेक्स और धोखा 2' हा चित्रपट सोडला आहे. दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित करत आहेत. याची निर्मिती एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी केली आहे. हा चित्रपट 19 एप्रिल 2024 रोजी रिलीज होणार आहे.
चित्रपटातील बोल्ड सीन्समुळे निम्रित कौरने 'लव्ह सेक्स और धोखा 2' मधील तिची भूमिका सोडली आहे. जेव्हा अभिनेत्री रिॲलिटी शो 'बिग बॉस 16'मध्ये होती, तेव्हा एकता कपूर शोमध्ये गेली होती. तिथे त्याने आपल्या चित्रपटासाठी निम्रितची निवड केली. मात्र, याच शोमध्ये निम्रित म्हणाली की, तिला हा चित्रपट करण्यात फारसा रस नाही, कारण यात खूप बोल्ड सीन्स आहेत.
दरम्यान, लव्ह सेक्स और धोखा हा चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात अंशुमन झा, नुसरत भरुचा, राजकुमार राव, नेहा चौहान, अमित सियाल आणि आशिष शर्मा सारखे नवोदित कलाकार दिसले. या चित्रपटाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटातील गाणीही प्रचंड प्रमाणात गाजली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.