Nana Patekar Emotional Post Dainik Gomantak
मनोरंजन

Nana Patekar Emotional Post: नाना पाटेकरांनी 'विक्रम गोखलें'चा फोटो शेअर करत लिहिली भावूक पोस्ट

Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर यांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करत विक्रम गोखले यांना आदरांजली वाहिली आहे.

दैनिक गोमन्तक

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे काल निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होता. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राजकीय नेत्यांपासून ते चित्रपटसृष्टीतील मोठ्या कलाकारांपर्यंत विक्रम गोखलेंच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करत विक्रम गोखले यांना आदरांजली वाहिली आहे.

ट्विटरवर (Twitter) पोस्ट करत नाना पाटेकर यांनी लिहीले आहे की, विक्रम मी कायम तुझ्यासमोर नतमस्तक होतो...असेन.. तुझ्यासारखा कलावंत आणि माणूस होणे नाही. अशा शब्दांत त्यांनी विक्रम गोखले यांना आदरांजली वाहिली आहे. 

विक्रम गोखले आणि नाना पाटेकर (Nana Patekar) अगदी जवळचे मित्र होते. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्सेही आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. विशेष म्हणजे, 'नटसम्राट' या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना जास्त भावली आहे. प्रेक्षक अगदी या भूमिकेच्या प्रेमात पडले होते. नाना पाटेकर यांनी साकारलेल्या आप्पा बेलवलकर यांच्या जिगरी दोस्ताची भूमिका विक्रम गोखले यांनी साकारली होती. 

2016 मध्ये रिलीज झालेल्या नटसम्राट या चित्रपटाने (Movie) बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटात नाना पाटेकर यांनी गणपतराव बेलवकर ही भूमिका साकारली होती. तर अभिनेते विक्रम गोखले यांनी रामभाऊंची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांचे डायलॉग्स आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

  • घरातूनच मिळाला अभिनयाचा वारसा

विक्रम गोखले यांना बालपणीच अभिनयाची गोडी लागली होती. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री होत्या. तर त्यांच्या आजी कमलाबाई गोखले म्हणजेच कमलाबाई कामत यादेखील अभिनेत्री होत्या. तसेच त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनीदेखील अनेक सिनेमांत काम केले आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

Goa Mangroves: 'खारफुटी हटवा, खाजन वाचवा'! गोवा फाऊंडेशन कोर्टात, पंचायतींकडून पत्रे; का आलीय शेती संकटात? वाचा..

Kala Academy: '..पुन्हा छताचा तुकडा कोसळला'! कला अकादमीला समस्यांचे ग्रहण; 60 कोटींच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

Illegal Houses Goa: एक लाख घरे होणार कायदेशीर? केवळ मालकी हक्क नसलेली घरे ‘बेकायदेशीर’ म्हणून गणली जाणार का!

Rashi Bhavishya 27 July 2025: कौटुंबिक प्रश्न सुटतील,खर्चावर नियंत्रण आवश्यक; आरोग्याची काळजी घ्या

SCROLL FOR NEXT