Home Minister Anil Deshmukh said We have received a complaint about the Tandav web series The series will be dealt with as per law
Home Minister Anil Deshmukh said We have received a complaint about the Tandav web series The series will be dealt with as per law 
मनोरंजन

 'तांडव'  वेबसीरिजच्या अडचणीत वाढ

गोमन्तक वृत्तसेवा

प्रसिद्द अभिनेता  सैफ  अली  खान  याची  'तांडव'  वेबसीरिज सध्या  वादाच्या भोवऱ्यात अडकली  आहे. या  वेबसीरीजमध्ये  हिंदू  देवतांचा  अपमान करण्यात आला असं म्हटलं  जात  आहे. त्यामुळे  या वेबसीरिजला  बॉयकॉट  करण्याची मागणी  नेटकऱ्यांनी  केली आहे.

"आम्हाला तांडव या वेब वेबसीरिजबाबत तक्रार मिळाली आहे, कायद्यानुसार या वेबसीरिज कारवाई केली जाईल. ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत केंद्र सरकारने कायदा आणला पाहिजे." असे ट्विट महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

त्याचबरोबर  "हिंदू देवता  भगवान शंकर यांची भूमिका साकारणारा अभिनेता जीशान अय्यूब याने जाहीर माफी मागावी आणि जोपर्यंत या वेबसीरीजमध्ये  आवश्यक  ते  बदल  होत नाहीत  तोपर्यंत  बहिष्कार टाका," असे  ट्वी़ट  राम कदमांनी केले आहे. 'तांडव' वेबसीरिज  दरम्यान  आता भाजप  आमदार  राम  कदम यांनी भाष्य केले  आहे. त्यामुळे  आता  याला  राजकीय  वळण येवू लागले आहे. तांडव वेबसीरिजवर बहिष्कार  टाकण्याची  मागणी  कदम यांनी  केली  आहे. 

तांडव  वेबसीरिजच्या  पहिल्या  एपिसोडमध्ये  भगवान  शंकर  आणि श्रीरामाची हेटाळणी  करण्यात  आली  असं सांगण्यात  येत  आहे. दरम्यान तांडव  ही वेबसीरिज  अब्बास   जफर  आणि  हिमांशू  मेहरा  निर्मित  9 भागांची वेबसीरिज आहे. निर्माते  तांडव या वेबसीरिजमध्ये  बदल करतील का?  हे  पाहणं आता आश्चर्याचं ठरणार  आहे.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

SCROLL FOR NEXT