Al Pacino and His Girlfriend Noor.
Al Pacino and His Girlfriend Noor. Dainik Gomantak.
मनोरंजन

Al Pacino Set to be Dad at 84: अल पचिनो 84 व्या वर्षी पुन्ह होणार बाप

गोमन्तक डिजिटल टीम

Al Pacino set to join the old dad club: हॉलीवूडचा दिग्गज अभिनेता अल पचिनो वयाच्या 84 व्या वर्षी चौथ्यांदा बाप होणार आहे. त्याची प्रेयसी आणि चित्रपट निर्माता नूर अलफल्लाहपासून पचिनोला हे चौथे अपत्य होणार आहे. याची माहिती अल पचिनोच्या माध्यम प्रतिनिधींनी दिली.

अल पचिनोला चौथ्यांदा बाप होणार असल्याची बातमी सर्वात प्रथम TMZ या मासिकाने प्रसिद्ध केली होती. अल पचिनोची 29 वर्षांची प्रेयसी अनूर अलफल्लाह सध्या आठ महिन्यांची गर्भवती आहे.

गेल्या वर्षी अल पचिनो आणि अनूर अलफल्लाह अनेकवेळा एकमोकांबर सार्वजनिक ठिकाणी दिसायचे. ती अल पचिनोला एप्रिल 2022 पासून डेट करत आहे.

अल्फल्लाहला अल पचिनोसोबत असलेले वयाचे अंतर कोणतीही समस्या वाटत नाही, एका सूत्राने एप्रिल 2022 मध्ये पेज सिक्सला दिलेल्या माहितीनुसार कुवेती-अमेरिकन चित्रपट निर्माता बहुधा खूप श्रीमंत वृद्ध पुरुषांनाच डेट करते.

ती स्व:ता एका गर्भश्रीमंत कुटूंबातून येते आणि तीचा वावर सातत्याने श्रीमंत लोकांसोबतच असतो. अल्फाल्लाह मूळची बेव्हरली हिल्सची रहिवासी आहे आणि तीने यूसीएलए स्कूल ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजनमध्ये शिक्षण घेतले, नंतर निर्माता म्हणून करिअर केले.

जुन्या प्रेयसींशीही सौख्य

अल पचिनोला सध्या त्याची आधिची प्रेयसी अभिनय प्रशिक्षक जॅन टेरंटकडून 33 वर्षांची मुलगी ज्युली मेरी, बेवर्ली डी'एंजेलोकडून 22 वर्षीय जुळे अँटोन आणि ऑलिव्हिया ही अपत्ये आहेत. अल पचिनो आणि बेवर्ली डी'एंजेलो 1997 ते 2003 या काळात एकत्र होते.

दरम्यान, चित्रपट निर्माता नूर अलफल्लाहने यापूर्वी ज्येष्ठ गायक मिक जेगर आणि अब्जाधीश निकोलस बर्ग्रुएन यांना डेट केले आहे.

अलि पचिनो सध्या आपल्या नव्या प्रेयसीच्या बाळाचे बाप होणार असले तरी, त्यांचे आधिच्या दोन्ही प्रेयसींशी चांगले संबंध असून त्यांनी विभक्त झाल्यानंतरही आपल्या मुलांना एकत्र वाढवले.

अच पचिनोची कारकिर्द

क्लासिक द गॉडफादर चित्रपट मालिकेचा स्टार अभिनेता अल पचिनो याने स्कारफेस, सेन्ट ऑफ अ वुमन, हीट, सर्पिको, सी ऑफ लव्ह, द डेव्हिल्स अॅडव्होकेट, द इनसाइडर, ...आणि जस्टिस फॉर ऑल यांसारख्या प्रतिष्ठित चित्रपटांमध्ये काम केले आहे.  

अलिकडच्या वर्षांत, अल पचिनो याने वन्स अपॉन अ टाइम इन हॉलीवूड, द आयरिशमन, हाऊस ऑफ गुच्ची, द पायरेट्स ऑफ सोमालिया, डॅनी कॉलिन्स यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

गेल्या महिन्यातच, अल पचिनोचा द गॉडफादर 2 चित्रपटातील सह-कलाकार रॉबर्ट डी नीरो, 79, यांनी गर्लफ्रेंड टिफनी चेनसह आपल्या 7 व्या मुलाला जन्म दिला. त्यांनी आपल्या मुलीचे नाव जिया व्हर्जिनिया चेन डी नीरो असे ठेवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

SCROLL FOR NEXT