A neat experiment of professional theater

 

Dainik Gomantak

मनोरंजन

‘फक्त 24 तास’: व्यावसायिक रंगभूमीच्या तोडीचा सफाईदार प्रयोग

दैनिक गोमन्तक

श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्य (Drama) समाज बांदोडा, या संस्थेने ‘फक्त 24 तास’ हे वर्धन कामत यांनी, मूळ लेखक तन्वीर खान यांचे अनुवाद केलेले नाटक सादर केले. भावनाप्रिय प्रेक्षक, मानवी स्वभावाचे नमुने तपासणारा विचारवंत प्रेक्षक आणि सर्वसामान्य प्रेक्षक यांच्या पचनी पडेल अशी संहिता त्यांनी लिहिली. थोडक्यात कथानक असे:

आपली पत्नी राधिका आणि अस्थमाचा आजार असलेली मुलगी अनुरा यांच्यासह डॉक्टर अभिराम मुंबईत (Mumbai) अतिशय श्रीमंत जीवनशैलीत राहत असतात. कार्डिओ सर्जन असलेल्या डॉ.अभिरामना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल मानाचा ‘आयएमए’ पुरस्कार घोषित होतो. अनुराच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी, दिल्लीत त्यांचा सत्कार करण्यात येतो. पुरस्कार सादरीकरणानंतर त्यांच्या पंचतारांकित हॉटेलमधील खोलीत एक स्त्री, त्यांच्याकडे शिताफीने येऊन कळवते की त्यांच्या मुलीचे, अनुराचे अपहरण झाले आहे, अपहरणकर्ता तिला घेऊन एका गुप्त ठिकाणी आहे. त्यांच्या पत्नीला सुद्धा नजरकैदेत ठेवले आहे.

डॉक्टरना लवकरच महिलेच्या मोबाईलवरून सांगण्यात येते की अपहरणकर्त्यांची मागणी एक कोटी रुपयांची आहे आणि ही रक्कम चोवीस तासांत हॉटेलवरील स्त्रीकडे दिली पाहिजे, जी देण्याची ते व्यवस्था करतात. पैशाची व्यवस्था होताच त्याना सांगितले जाते की त्यांच्या आजारी मुलीसाठी आवश्यक औषधे पुरवायची होती, आता दोन कोटी रुपयांची मागणी आहे. असहाय्य डॉक्टर या अतिरिक्त रकमेची देखील व्यवस्था करतात. परंतू अवघ्या काही वेळात त्यांना सांगण्यात येते की खंडणीची मागणी आता तीन कोटी रुपये आहे.

अभिराम आपली सर्व बचत, उसनवारी, आपली मालमत्ता गहाण ठेऊन, पैशाची व्यवस्था करून रक्कम हॉटेलावर खोलीत आणण्याची व्यवस्था करतात. परत मोठ्या रकमेची मागणी करुन ती स्त्री धूर्तपणे पैशांची सुटकेस घेऊन निघून जाते. जेव्हा अभिराम मुंबईला परततात, तेव्हा त्याच्या मुलीची अद्याप सुटका झालेली नसते. अपहरणकर्ता येऊन अनुरा वारल्याची बातमी दिल्यावर अभिराम आणि राधिका कोलमडतात.

अभिरामनी मागणी केलेल्या भल्या मोठ्या रकमेची व्यवस्था न केल्यामुळे,ऑपरेशन न झाल्यामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगून अभिरामना अद्दल घडवण्यासाठी अनुराचे अपहरण केल्याचे अपहरणकर्ते सांगतात. शेवटी अपहरणकर्ते अनुराला सुरक्षित परत करुन, त्यानी घेतलेली तीन कोटी रुपयांची रक्कमसुद्धा परत करतात. डॉक्टरी पेशाला समाजसेवा म्हणणाऱ्यांचा काळ संपत आला आहे. पूर्वी छोट्याशा दवाखान्यात ‘पेशंट’ना ‘दवा’ देऊन ‘दुवा’ घेणारा, डॉक्टर-पेशंट असे घट्ट नाते निर्माण करणारा ''फॅमिली डॉक्टर'', एक जिव्हाळ्याचा ‘फॅमिली मेंबर’ असणारा डॉक्टर, आता ‘पेशंट’ पासून दूर जाउन ''अपॉईन्टमेंट'' मिळून तपासण्यापर्यंत पेशंटला बराच ''वेटिंग'' करणारा ‘स्पेसिअलिस्ट’ डॉक्टर बनला आहे. ''व्यावसायिकते''ने घेतल्यामुळे सामान्य पेशंट आर्थिक, शारीरिक आणि मानसिक रित्या भरडला जात आहे.

प्रत्येक व्यवसायात चांगली माणसे काम करताना त्यात काही व्यक्ती चुकीची कामे करताना आढळतात. मात्र, या व्यक्तीमुळे इतरांना संपूर्ण समाजासमोर मान खाली घालण्याची वेळ येते. हीच परिस्थिती वैद्यकीय व्यवसायातही रूढ झाली आहे. '' प्रॅक्टीस'' करीत आपला खिसा भरणाऱ्या डॉक्टरांमधील माणुसकी हरवल्याचे जाणवते. डॉक्टर होण्यासाठी, हॉस्पिटलसाठी, केलेला खर्च पेशंटकडून ‘उकळल्याशिवाय’ पर्यायच नाही, असा विचार डॉक्टरांची ही नवी पिढी करताना दिसत आहे. यामुळे या ‘नोबल’ व्यवसायात ‘धंदेवायिकता’ किती आली हे स्पष्ट होते.

वास्तववादी शैलीतील नाटकाचे दिग्दर्शन करताना सुशांत नायकनी संहितेतील बारकाव्यांचा अभ्यास करून व्यावसायिक रंगभूमीच्या तोडीचा प्रयोग सादर केला. नाटकात गतिमान घटना असल्या तरी प्रयोग किंचित संथ आणि विस्कळीत वाटला. घटनांचे ‘डिटेलिंग’ जास्त झाल्याचा परिणाम असू शकतो. पात्रांच्या व्यक्तिचित्रणासाठी असलेली काही दृश्ये आटोपशीर झाल्यास, प्रयोगाची उंची अजून वाढेल असे वाटते. राघोबा देसाई यांचे नेपथ्य कल्पक, व्यापक, अवाढव्य आणि खूपच ‘डिटेलिंग’ करणारे होते. नेपथ्य सहाय्य सुबोध कुर्पासकर आणि कै. काशिनाथ होळकर यांचे. सुशांत नायक यांनी प्रकाश योजनेची बाजू सांभाळली. त्यांची डिझाईन योग्य वाटली पण योग्य उपकरणांची उपलब्धी नसल्यामुळे आलेली अडचण जाणवली. कलर फिल्टरचा योग्य वापर जाणवला. अपुऱ्या प्रकाशात साखळीच्या रंगमंचावरील पात्रांच्या चेहऱ्यावरील भाव तिसऱ्या रांगेतूनसुद्धा टिपण्यास अडचण येत असल्याचा विचार केल्यास अतिउत्तम झाले असते.

पार्श्वसंगीत तानाजी गावडे, वेशभूषा शंभुनाथ केरकर आणि रंगभूषा लवलेश कवळेकर यांची राधिका ही व्यक्तिरेखा साध्वी मावजेकर यांनी अत्यंत समजूतदारपणे उभी केली. उच्चारपद्धती-लवचिकपणा-शारीरिक हालचाली, त्यांना व्यक्त होण्यास योग्य साथ देत होत्या. विशेष लक्ष वेधून घेणारी अनुरा या छोट्या मुलीची भूमिका बालकलाकार श्रिनीका नाईक हिने कमालीच्या प्राविण्याने सादर केली. तिने हालचाली, हावभाव ,आवाज, अवलोकन शक्ती आणि कल्पनाशक्तीद्वारे, स्वभाव-सूचक आणि तपशीलपूर्ण अभिनयातून आपला प्रभाव पाडला. डॉक्टर अभिरामच्या भूमिकेस वर्धन कामत यांनी योग्य न्याय दिला. एक-दोन वेळा संवादफेकीतील अडखळा जाणवला. राघवच्या व्यक्तिरेखेत अमोघ बुडकुले शोभून दिसले पात्राची बाह्य तसेच आंतरिक बाजू दर्शवण्याचा प्रयत्न त्यांच्या अभिनयातून झाल्याचे दिसले. अभिषेक नाईक यांनी बाळूच्या भूमिकेत, बाळूच्या स्वभावातील विसंगतीचे दर्शन, आपल्या अभिनयातून-वैचारिक हास्यातून दाखवून दिले. निकिताचे पात्र डॉक्टर संस्कृती रायकर याना शोभून दिसले. त्यांचे हावभाव, शारीरिक हालचाली आणि संवादफेक योग्य वाटली. टीव्ही अँकर बनलेल्या सेजल दिवकर आणि दिया झालेल्या दिशांता बुडकुले यांनी आपल्या भूमिका योग्यपणे सादर केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हणजूण येथे कंस्ट्रक्शन साइटवरुन पडून पश्चिम बंगालच्या मजूराचा जागीच मृत्यू!

Goa Vacation: बस, ट्रेन, विमान! सुट्टीत पुणे, मुंबईतून गोव्याला जाण्यासाठी कोणता पर्याय चांगला, किती रुपये मोजावे लागतील?

Borim News: गोव्यासाठी गुड न्यूज! बोरी पुलासाठी भारत सरकारकडून अधिसूचना जारी; लवकरच होणार पायाभरणी

Goa Dengue Cases: मडगावात डेंग्यूचे तुरळक प्रमाणात रुग्ण! तातडीने उपाययोजना केल्याचा परिणाम

Harvalem Panchayat: कोण बाजी मारणार? हरवळे पंचायत निवडणूकीवर सर्वांचे लक्ष

SCROLL FOR NEXT