covid vaccine centre.jpg
covid vaccine centre.jpg 
महाराष्ट्र

लसींअभावी राजधानीत लसीकरण केंद्रे बंद; नागरिक आल्या पावली परतले

दैनिक गोमंतक

महाराष्ट्र :  राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने परिस्थिती अधिक भयावह होत चालली आहे. लसींअभावी लसीकरण मोहिमही बंद पडत चालली आहे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा पडला असून कोरोना रुग्णांवर उपचारासाठी लागणारे रेमडेसिवीर औषधाचा साठाही संपत चालला आहे. यामुळे राज्यातील संसर्गही वेगाने वाढत आहेत. याहून चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील इतर ठिकाणांप्रमाणे राज्याची राजधानी मुंबईतही लसींच्याअभावी 35 हून अधिक खाजगी लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. मुंबईच्या चेंबूर परिसरातील सुश्रुत रुग्णालयात लस संपल्यामुळे लसीकरण सुरु असेल या अपेक्षेने आलेले अनेक नागरिक आपल्या पावली परतले आहेत. रुग्णालायच्या मुख्य प्रवेशद्वारावर लस संपल्याचा बोर्ड पाहून  निराश झालेलया नगरिकांना घरी परताव लागल्याची माहिती समोर आली आहे. (One death every three minutes in Maharashtra; So two thousand patients per hour)

त्याचबरोबर कोरोनाने महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले आहे. दर तासाला कोरोनाच्या 2 हजार नवीन रुग्णांची भर पडत आहे.  तर दर मिनिटाला 2859 लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होत  आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे दर तीन मिनिटांत एक व्यक्ती या विषाणूमुळे मरत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये दररोज वाढ होत असून रविवारी 68 हजार 631 नवीन प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. एका दिवसात राज्यात प्रथमच कोरोनाची इतकी प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.  तर राज्यातील नवीन प्रकरणामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 38 लाख 39 हजार 338 वर पोहचली आहे, तर रविवारी राज्यात कोरोनाने 503 जणांचा मृत्यू झाला आहे.  त्यामुळे राज्यात कोरोनाने  मृत्यू झालेल्यांची संख्या आता 60 हजारांच्या पुढे गेली  आहे. तर नव्या प्रकरणांपैकी 8 हजार 468 प्रकरणे केवळ मुंबईची आहेत. मुंबईत आतापर्यंत  कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 12 हजार 354 वर पोहचली असून रविवारी 53 मृत्यू नोंदले गेले.

धक्कादायक! ऑक्सिजन अभावी दीड तासात गोंदियात 15 जणांचा मृत्यू
तथापि, महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे आरोग्य सेवा कोलमडली आहे. राज्यात ऑक्सिजनची तीव्र कमतरता असल्याने भारतीय रेल्वेने 'ऑक्सिजन एक्सप्रेस' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्यांद्वारे राज्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडर्स पुरवण्याची घोषणा भारतीय रेल्वेने केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी याबाबत माहिती दिली. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रात कोणत्याही कोरोना पेशंटचा मृत्यू झाला नाही, असा दावा त्यांनी केला आहे.  मात्र  रुग्णालयात जाण्यास उशीर झाल्यामुळे कोरोनाचे रुग्ण मरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात सध्या 'मिनी लॉकडाउन' आहे ज्यामध्ये सर्व निर्बंध लादले गेले आहेत. राज्यात शनिवार व रविवार लॉकडाउन सह कलम 144  लागू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

Sattari News : सत्तरीत तालुक्यात नदी परिसरात जिलेटिनचा धोका वाढला; जलप्रदूषणाची शक्यता

Air Pollution: वायू प्रदूषणानं वाढवली चिंता! टाईप 2 डायबिटीजच्या रुग्णांमध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ; संशोधनातून खुलासा

Goa Today's Live News Update: लाच, खंडणी प्रकरण! पिळगावकरांना न्यायालयीन कोठडी

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

SCROLL FOR NEXT