Brijbhushan Singh and Raj Thackeray
Brijbhushan Singh and Raj Thackeray  Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध ही माझी व्यक्तिगत भूमिका: खासदार ब्रिजभूषण

Akash Umesh Khandke

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी केली आहे. तसे न केल्यास ठाकरेंना उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

याबाबत बोलताना ब्रिजभूषण सिंह म्हणाले, "महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजा, शाहू महाराजांसारखे लोक जन्मले, मात्र त्याच भूमीवर उत्तर भारतीयांना शिवीगाळ मारहाण करणारे राज ठाकरे देखील जन्मले."

ब्रिजभूषण सिंह पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात राज ठाकरे अजानचा विरोध करू, अथवा हनुमान चालिसाचं पठण करो मला त्याच्याशी घेणंदेणं नाही. माझी भूमिका पक्षाची भूमिका नाही, माझी व्यक्तिगत भूमिका आहे. श्रीराम देखील उत्तर भारतीय होते. त्यांच्या वंशजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला माफी मागाविच लागेल."

राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर जाण्याचे जाहीर केल्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावर ठाकरे आता काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

Sattari News : सत्तरीत तालुक्यात नदी परिसरात जिलेटिनचा धोका वाढला; जलप्रदूषणाची शक्यता

Goa Today's Live News Update: पणजी कधीच सोडणार नाही, अनेकांची स्वप्न ही स्वप्नच राहतील! मोन्सेरात

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

Watch Video: लंडनमध्ये PM मोदींची धूम! रन फॉर मोदी आणि फ्लॅश मॉब कार्यक्रमाचं भव्य आयोजन; भारतीय समुदायानं...

SCROLL FOR NEXT