drone spraying
drone spraying 
महाराष्ट्र

ड्रोनद्वारे टोळधाडीवर फवारणीचा प्रयोग

Dainik Gomantak

मुंबई

राज्यात अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांतील काही भागांमध्ये टोळधाडीचे आक्रमण झाले असून, कृषी विभागामार्फत कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे. ड्रोनच्या माध्यमातून या टोळधाडीवर कीटकनाशकांची फवारणी करण्याबाबत प्रयोग करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले. मुंबईसह कोकण भागात या टोळधाडीचा प्रादुर्भाव नसल्याचेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.
24 मेच्या सुमारास मध्य प्रदेशातून अमरावती जिल्ह्यातील काही भागांत हे कीटक आले. अग्निशमन दलाच्या बंबांच्या माध्यमातून तसेच कीटकनाशक फवारणी यंत्रांच्या साह्याने त्यांच्यावर फवारणी करून 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नायनाट झाल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले आहे. या कीटकांवर फवारणी करण्यासाठी लागणारे कीटकनाशक प्रादुर्भाव असलेल्या भागातील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मोफत पुरवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईसह कोकण भागात या टोळधाडीचा प्रादुर्भाव नाही. गुरुवारी यासंदर्भात समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या चित्रफितीमध्ये ज्या भागाचा उल्लेख होता, तेथे ठाणे विभागाचे कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तेथे टोळधाडीचे आक्रमण झाले नसल्याचे पाटील यांनी सांगितले; मात्र गुजरातकडील भागातून या कीटकांचे आक्रमण होऊ शकते ही शक्‍यता गृहीत धरून पालघर आणि गुजरात सीमेलगतच्या भागातील शेतकरी बांधवांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याचे सह संचालक पाटील यांनी सांगितले.


अमरावती जिल्ह्यात पिकांचे नुकसान
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, मोर्शी, वरूड या तालुक्‍यांतील काही भागांत टोळधाड येऊन गेल्याचे निष्पन्न झाले असून तेथील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले नसल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. टोळधाडीपासून शेतीपिकाचे नुकसान टाळण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांना दिवसा प्रामुख्याने पत्र्याचे डबे वाजवणे, ट्रॅक्‍टर, मोटर सायकलचे सायलेन्सर काढून मोठा आवाज करून किडीला हुसकावून लावणे आदी उपाययोजना करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT