udhav thakare.jpg
udhav thakare.jpg 
महाराष्ट्र

नुकसानीचा अहवाल आल्यानंतर तात्काळ मदतीचा निर्णय घेऊ; उद्धव ठाकरेंची ग्वाही 

दैनिक गोमंतक

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone)  महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.  सिंधुदुर्ग (Sindhudurg)  आणि रत्नागिरी (ratnagiri)  जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे.  या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौरा (CM Uddhav Thackray Konkan Visit)  करणार असून झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत.  उद्धव ठाकरे आज सकाळी रत्नागिरीत पोहचले असून त्यांनी नुकतीच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे रवाना होणार आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. वादळानंतर विरोधक दोन दिवसांपासून कोकणात फिरत असून उद्धव ठाकरे मात्र चार तासांचा दौरा करत असल्याची टीका विरोधकांनी केली होती. या टीकेलादेखील उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.  (Decide on immediate help upon receipt of a loss report; Uddhav Thackeray) 

'' कोकणवासीयांना दिलासा  देण्यासाठी आलो असल्याचे म्हटले उद्धव ठाकरे यांनी आहे. तसेच पंचनामे पूर्ण करून मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. '' मी फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही. हेलिकॉप्टरमधून नाहीतर जमिनीवरुन पाहणी करत आहे. असं म्हणत विरोधकांना टोलाही लगावला आहे.  वादळामुळे तात्काळ मदतीचे आदेश आले असून येत्या दोन ते तीन दिवसांत पंचनामे  पूर्ण होतील.  माझा  पॅकेजवर विश्वास नसून जे महत्त्वाचे आहे ते करणार आहोत. तसेच नुकसानीचा अहवाल आल्यानंतर तात्काळ मदतीचा निर्णय घेऊ. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही.   तसेच, वादळात  ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना सरकार नाराज करणार नाही. नुकसानग्रस्तांसाठी जे करता येणं शक्य आहे ते सर्व उपाय केले जातील.  अशी ग्वाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली. 

तसेच, मदतीचे निकष बदलण्यासंबंधी आपण पुनः एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.  त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान मोदींनी गुजरातला जाहीर केलेल्या मदतीवर देखील भाष्य केले.  मी येथील विरोधी पक्षाप्रमाणे बोलणार नाही. पंतप्रधान आपल्याकडे आले नसले तरी ते गुजरातप्रमाणे महाराष्ट्रालादेखील मदत करतील,'' असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.  तसेच, किनारपट्टी भागाला वादळापासून वाचण्यासाठी कायमची सुविधा निर्माण करण्याची गरज असून त्यासाठी मदत करण्याची विनंतीही त्यांनी यावेळी पंतप्रधानांकडे केली. 

असा आहे उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा 

  • सकाळी 8.30  वाजता – रत्नागिरीत आगमन
  • सकाळी 8.40 वाजता-      नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक घेणार 
  • सकाळी10.10  –     चक्रीवादळामुळे झालेल्या मालवणमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करणार 
  • सकाळी 11 वाजता  –  वेंगुर्ला येथील नुकसानीची पाहणी करणार 
  • सकाळी 11.30 वाजता -    नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक घेणार 
  • दुपारी 12.35 वाजता-       रत्नागिरी विमानतळावरुण विमानाने मुंबईकडे प्रयाण 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT