People were evacuated to Ratnagiri on the backdrop of the storm
People were evacuated to Ratnagiri on the backdrop of the storm 
महाराष्ट्र

Cyclone Tauktae: रत्नागिरीत 652 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

दैनिक गोमंतक

रत्नागिरी:  तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) तिव्रता वाढली असून रत्नागिरीत (Ratnagiri) हलक्या वार्‍यासह पाऊसही पडू लागला आहेत. वादळापूर्वी पावसाने हजेरी लावली आहे. राजापूर (Rajapur) तालुक्यातील आंबोळगडसह रत्नागिरी तालुक्यातील 652 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. प्रशासन सज्ज झाले असून किनारी भागांवर सर्वाधिक लक्ष ठेवण्यात आले आहे. (Citizens of Ratnagiri have been shifted to safer places in the wake of the storm.)

Cyclone Tauktae: झाडं पडले, छतं उडाले, गोव्यात तौकतेचे थैमान...
तौक्ते चक्रीवादळ दुपारी राजापूर तालुक्यातील आंबोळगड येथून जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करणार आहे. राजापूरात सकाळपासून वार्‍याचा वेग वाढला असून पाऊसही पडत आहे. काही ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळली आहेत. ती बाजूला करण्याचे काम सुरु आहे. रत्नागिरी तालुक्यात पहाटेपासून हलके वारे वाहण्यास सुरवात झाली. अधूनमधून पावसारच्या सरी पडत आहेत. या वार्‍यामुळे मोठे नुकसान झालेले नाही. समुद्र किनार्‍यांवर लाटांची गाज ऐकायला मिळत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड, गणेशगुळेसह परिसरातील 85 कच्च्या घरातील  652 नागरिकांचे आजूबाजूच्या घरात स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच रत्नागिरीतील सर्वात मोठ्या मिरकरवाडा बंदरामध्ये शेकडो नौका उभ्या करुन ठेवण्यात आल्या आहेत. वादळामुळे त्यावरील खलाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने त्यांना सुरक्षित ठिकाण हलविण्याचे आवाहन केले आहे.

CYCLONE TAUKTAE: तौकते वादळाचे लाईव्ह लोकेशन पहा तुमच्या मोबाईलवर
तहसिलदार शशिकांत जाधव, सहायक मत्स्य आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आज सकाळी मच्छीमारांशी संवाद साधला. अनेक मच्छीमारांनी खलांशांना आपापल्या गोडावूनमध्ये जागा उपलब्ध करुन दिली आहे. सुमारे दीड हजाराहून अधिक खलाशी आहेत.राजापूरच्या सीमावर्ती भागात वादळाची आले असून तालुक्यात सागवे, नाटे, जैतापूर, आंबोलगड, मुसाकाझी परिसरात वादळी वारा व पाऊस सुरू झाला आहे. आंबोळगड येथील 68 कुटुंबातील 254 व्यक्तीचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. मुसाकाझी येथील दोन कुटुंबातील लोकांचे स्थलांतर केले.

आवळीचीवाडी येथील 7 कुटुंबातील 35 व्यक्तीचे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. राजापूर डोंगर मार्गावर झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली असून, झाड हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरु आहे. नाटे आणि परिसरात वेगाने वारे वाहायला सुरुवात झाली आहे आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. जैतापुरात वार्‍यामुळे घरांची किरकोळ पडझड झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात शनिवारपासून पावसाला सुरूवात झाली आहे. गेल्या 24 तासात 124 मिमी पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 39 मिमी पाऊस पडला. संगमेश्वरात 22 मिमी, दापोली आणि गुहागरात प्रत्येकी 12 मिमी, लांजा आणि राजापूरला प्रत्येकी 13 मिमी पाऊस पडला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT