Chhota Rajans niece Lady Don Priyadarshini arrested from Pune
Chhota Rajans niece Lady Don Priyadarshini arrested from Pune 
महाराष्ट्र

छोटा राजनची भाची लेडी डॉन प्रियदर्शिनीला पुण्यातून अटक

गोमंन्तक वृत्तसेवा

पुणे: गँगस्टर छोटा राजनची(Gangster Chhota Rajan) भाची देखील अंडरवर्ल्डमध्ये प्रसिद्ध आहे आणि तीला 'लेडी डॉन' (Lady Dawn)म्हणून ओळखले जाते. लेडी डॉन प्रियदर्शिनी निकालजे(Priyadarshini Nikalje) हिला बुधवारी पुण्याच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलने(Pune Anti Extortion Cell) अटक केली आहे. प्रियदर्शिनीने स्वत: ला एका राजकीय पक्षाचा नेता सांगून 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. असे म्हटले जाते की प्रियदर्शिनीची स्वत: ची एक टोळी असून खंडणी मागण्यासाठीच्या अनेक प्रकरणांमध्ये ती सहभागी आहे.(Chhota Rajans niece Lady Don Priyadarshini arrested from Pune)

खंडणी मागण्याच्या प्रकरणात प्रियदर्शिनी गेल्या एक वर्षापासून फरार होती. तिच्या टोळीतील सदस्याच्या माहितीवरून प्रियदर्शिनीला अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्च 2020 मध्ये तीने एका राजकीय पक्षाची अध्यक्ष असल्याचा दावा करत एका व्यक्तीकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न मिळाल्यास त्या व्यक्तीला जिवे मारण्याची धमकीही प्रियदर्शिनी यांनी दिली होती. गँगस्टर छोटा राजनची भाची असल्याचे सांगून प्रियदर्शिनीने लोकांकडूम अनेकदा खंडणी मागितली आहे.

सापळा लावून केली अटक

या प्रकरणात प्रियदर्शनीच्या जवळचे साथिदार धीरज साबळ आणि मंदार वाइकर यांना 25 लाखांची खंडणी घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या दोघांनीही त्यांच्या गँग लीडर प्रियदर्शिनीला त्यांना अटक झाल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून ती फरार झाली होती. मंगळवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक कक्षाशी संबंधित लोकांना प्रियदर्शनी निकालजे वानवडी भागात राहत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि तीला पकडले. सध्या प्रियदर्शिनीला 7 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठविण्यात आले आहे.

छोटा राजनची टोळी अजूनही सक्रिय आहे
मिळालेल्या माहितीनुसार छोटा राजन हा दिल्लीच्या तिहाड कारागृहात बंदी आहे परंतु त्याची टोळी अजूनही कार्यरत आहे. 1993 च्या मुंबई सिरियल स्फोट प्रकरणानंतर दाऊदच्या सर्वात खास असलेल्या छोटा राजनने स्वत: ची वेगळी टोळी तयार केली होती. यानंतर दाऊद आणि छोटा राजनमध्ये बरीच वर्षे टोळी युद्ध चालूच होते. 27 वर्ष फरार राहिल्यानंतर छोटा राजन याला नोव्हेंबर 2015 मध्ये अटक करण्यात आली होती व इंडोनेशियातून भारतात आणण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT