BJP leader Kirit Somaiya will address press conference to expose scam of   ministers from Thackeray government
BJP leader Kirit Somaiya will address press conference to expose scam of ministers from Thackeray government  Dainik Gomantak
महाराष्ट्र

ठाकरे सरकारमधील आणखी दोन मंत्र्यांचा करोडोंचा घोटाळा, किरीट सोमय्यांची आज पत्रकार परिषद

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र भाजपचे (Maharashtra BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आणखीन एक मोठा दावा केला आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) दोन दिग्गज मंत्र्यांच्या करोडोच्या घोटाळ्यांचे हजारो पानांचे सबळ पुरावे आपल्याकडे असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे सरकारला पुन्हा एकदा टार्गेट केलं आहे. यातील एक मंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्ष शिवसेनेचा (Shivsena) आणि दुसरा मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे की, त्यांच्याकडे या दोन मंत्र्यांचा पर्दाफाश करण्यासाठी सर्व फाईल्स तयार आहेत. शेकडो हजार कोटींचे घोटाळे उघडकीस आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी ते या दोन मंत्र्यांपैकी एकाचा घोटाळा उघड करणार आहेत . (BJP leader Kirit Somaiya will address press conference to expose scam of ministers from Thackeray government)

किरीट सोमय्या यांनी दावा केला आहे की त्यांच्याकडे दोन मंत्र्यांच्या फायली पूर्णपणे तयार आहेत. पण सोमवारी ते यापैकी एकाच मंत्र्याचा घोटाळा उघड करणार आहे.तर दुसऱ्या मंत्र्यांचे नाव दहा दिवसांनी उघड होईल.

किरीट सोमय्या यांनी दावा केला आहे की, या दोन मंत्र्यांपैकी एकाचा घोटाळा ते उघड करू शकतात. शिवसेनेचे मंत्री प्रथम येतील की राष्ट्रवादीचे मंत्री प्रथम येतील हे ते पत्रकार परिषदेपूर्वी ठरवेल असे देखील किरीट सोम्म्या यांनी सांगितले आहे. सोमवारी दुपारी 1 वाजता त्यांनी भाजपच्या नरिमन पॉईंट कार्यालयात पत्रकार परिषद बोलावली आहे. याच पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या सरकारच्या मंत्र्याच्या घोटाळ्याचे सर्व पुरावे सादर करणार आहेत.

किरीट सोमय्या यांनी त्यांच्याकडे दोन मंत्र्यांच्या विरोधात कागदपत्रे आहेत. त्यापैकी एकाच्या विरोधात 2400 पानांची कागदपत्रे आणि दुसऱ्याच्या विरोधात 4000 पृष्ठांची कागदपत्रे असल्याचे स्पष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT