आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही रिल्स एवढ्या व्हायरल होतात की लोक त्यावर अनेक मजेशीर व्हिडीओ बनवताना दिसतात. तुम्ही सध्या व्हायरल होत असलेले आप्पाचा विषय हार्ड आहे, हे गाणं ऐकले असेल. सोशल मीडियावर अनेक जण या गाण्यावर रिल बनवताना दिसत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आंबोली घाटातील आहे.
दरम्यान, आंबोली घाटात रस्त्याच्या कडेला एक टेम्पो फसतो. टेम्पोमुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी होते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्यानंतर लोक रस्त्याच्या कडेला फसलेला टेम्पो काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. पण यामध्येच एक व्यक्ती (आप्पा) घटनास्थळी पोहोचतो. एका मोठ्या दोरीने पहिल्यांदा जीपला बांधून जवळच्या झाडाचा आधार घेत फसलेल्या टेम्पोला बांधून लोक ओढतात. त्यानंतर लोकांच्या प्रयत्नांना यश मिळते. उपस्थित लोक टाळ्या वाजवून अप्पाचं कौतुक करतात.
सोशल मीडियावर (Social Media) एखादं नवीन गाणं प्रदर्शित झालं की, ते खूप चर्चेत येतं. चर्चेत असलेल्या या गाण्यांवर लाखो लोक रील्स, व्हिडीओ बनवतात. अगदी भारतीयच नव्हे, तर परदेशांतील कलाकारही या गाण्यांवर ठेका धरतात. तसेच लहानांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना या ट्रेंडिंग गाण्यांवर व्हिडीओ बनवल्याशिवाय राहवत नाही.
सध्या सोशल मीडियावर ‘आप्पांचा विषय लय हार्ड’ हे मराठी गाणं खूप चर्चेत आहे; ज्यावर अनेक जण रील्स बनवताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी, एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये चक्क एका बोक्याचे रिल बनवले गेले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.