Online Cricket Betting: पर्वरीत क्रिकेट सट्टाबाजीचा पर्दाफाश; ५ जणांना अटक, सुमारे लाखभर रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

Betting in Porvorim: गोवा पोलिसांनी पर्वरीतील साल्वादोर या भागातून क्रिकेटची सट्टाबाजी करणाऱ्या एका गटाला अटक, पाच आरोपींच्या अटकेसह पोलिसांनी एक लाख सत्तर हजार रुपयांची विविध इलेट्रॉनिक उपकरणे जप्त केली

Online Cricket BettingDainik Gomantak
Published on
Updated on

Online Cricket Betting, Porvorim

पर्वरी: गोवा पोलिसांनी काल (दि. 21ऑक्टोबर) रोजी पर्वरीतील साल्वादोर या भागातून क्रिकेटची सट्टाबाजी करणाऱ्या एका गटाला अटक केली. पीआय राहुल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना पर्वरीतील एका बंगल्यात क्रिकेटची सट्टेबाजी सुरु असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीवर त्वरित अंमलबजावणी करत त्यांनी छापा टाकण्यासाठी एक पथक बनवलं आणि मध्यरात्री बंगल्यावर छापा टाकला. सध्या जगभरात विविध लीग सुरु आहेत आणि त्यामुळे आरोपी देखील क्रिकेटसह इतर खेळांवर सट्टा लावताना पोलिसांच्या हाती सापडले.

पोलिसांनी छापा टाकून रुचित कुमार (बिहार),प्रांजल भाटी (मध्य प्रदेश), निखिल कुमार (बिहार) कुणाल कुमार (मध्य प्रदेश) आणि वंश शर्मा (कर्नाटक) यांना गोवा दमण-दीव सार्वजनिक जुगार कायद्याच्या कलम 3 आणि 4 अंतर्गत अटक करण्यात आलीये.

Betting in Porvorim: गोवा पोलिसांनी पर्वरीतील साल्वादोर या भागातून क्रिकेटची सट्टाबाजी करणाऱ्या एका गटाला अटक, पाच आरोपींच्या अटकेसह पोलिसांनी एक लाख सत्तर हजार रुपयांची विविध इलेट्रॉनिक उपकरणे जप्त केली
Goa Unemployment: गोव्यातल्या घरफोडीच्या घटनांचा बेरोजगारीशी संबंध? काँग्रेस नेत्याने मांडले तर्क

पाच आरोपींच्या अटकेसह पोलिसांनी एक लाख सत्तर हजार रुपयांची विविध इलेट्रॉनिक उपकरणे जप्त केली. यांमध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप, वायफाय राउटर यांचा समावेश होता. पर्वरीत छापा टाकणाऱ्या पोलीस पथकाचे नेतृत्व एसडीपीओ विश्वेश कर्पे यांच्यासह पीआय राहुल परब यांनी केले. या गटात हवालदार महादेव नाईक, तुषार राऊत, नितेश गावडे यांचा समावेश होता.

वर्ष 2023 मध्ये देखील पर्वरीतील मंत्री हॉटेलमध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला होता आणि गोवा पोलिसांनी इथे छापा टाकत तब्बल 2 लाख रुपयांचे इलेक्ट्रॉनिक सामान जप्त केले होते तर 12 आरोपींना अटक करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com