Vinayak Raut
Vinayak Raut 
महाराष्ट्र

त्या चार खुनांची पुन्हा चौकशी करा

गोमन्तक वृत्तसेवा

कुडाळ

अभिनेता सुशांत सिंग रजपूत आत्महत्याप्रकरणी तत्परता दाखवून टाहो फोडणारे भाजप खासदार नारायण राणे आपले सख्खे चुलत भाऊ अंकुश राणे यांच्या खूनप्रकरणी गप्प का, असा सवाल शिवसेना लोकसभा गटनेते खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला. जिल्ह्यात 2002 पासून निरपराध चार व्यक्तींची हत्या झाली. त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार आहोत, असेही ते म्हणाले.
सुशांत सिंग रजपूत मृत्यूप्रकरणी राणे यांनी आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले होते. माजी खासदार नीलेश राणे यांनीही टीका केली होती. या पार्श्‍वभूमीवर श्री. राऊत यांनी आमदार वैभव नाईक, जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, जिल्हाप्रमुख संजय पडते, सभापती नूतन आईर, उपसभापती जयभारत पालव, राजन नाईक आदींसह पत्रकार परिषद घेतली.
राऊत म्हणाले, ""खासदार राणे हे सुशांत सिंग रजपूत आणि त्याची सचिव दिशा आत्महत्याप्रकरणी शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टाहो फोडत आहेत. या प्रकरणी राणे यांनी ज्या तत्परतेने पत्रकार परिषद घेतली; मात्र ही तत्परता स्वतः पालकमंत्री असताना त्यांनी अजिबात दाखवली नाही. त्यांचे चुलत भाऊ अंकुश राणे यांच्या मृत्यूबाबत ते बोलले नाहीत. अंकुश राणेंचे मारेकरी कोण, त्यांचा खून कुणी केला, सूत्रधार कोण, याबाबत राणे गप्प का? खरं तर सुशांत सिंग रजपूत आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिस तत्परतेने तपास करत आहेत. दुसरीकडे राज्य सरकारने मागणी न करता केंद्र सरकारने हस्तक्षेप करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी लावली आहे. आता आम्ही मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे अभिनेता सुशांत सिंग रजपूतसह सत्यविजय भिसे, रमेश गोवेकर, अंकुश राणे, रमेश मंचेकर यांच्या खुनाची, मृत्यूची पुन्हा उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार आहोत. त्यावेळी स्वतः राणे मंत्रिपदावर होते तरीसुद्धा त्यांनी या प्रकरणांच्या चौकशीची मागणी केली नाही; पण आता आम्ही या चारही खुनांचा तपास उच्चस्तरीय झाला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी करत आहोत.''

"त्या' मुद्‌द्‌यावर राणे गप्प का?
महाराष्ट्रातील जनतेवर कर्नाटकी पोलिसांचा उपद्रव काही कमी नाही. कर्नाटकात शिवपुतळा हलविण्यात आल्यानंतर सर्व शिवभक्तांनी या घटनेचा निषेध केला; पण मराठी समाजाचा नेता म्हणून टेंभा मिरविणारे खासदार राणे यावर चकार शब्द काढत नाहीत. यातूनच त्यांचा संधिसाधूपणा दिसून येत असल्याची टीकाही खासदार राऊत यांनी केली.

संपादन- अवित बगळे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT