Goa Flood Dainik Gomantak
Live Updates

Goa Todays Live Update: राज्यात परतीच्या पावसाचं धूमशान; समुद्राच्या पातळीत वाढ

Manish Jadhav

राज्यात परतीच्या पावसाचं धूमशान; समुद्राच्या पातळीत वाढ

राज्यात परतीच्या पावसानं हाहाकार उडवला आहे. सातत्याने पडत असणाऱ्या पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. समुद्राच्या पातळी वाढ झाली असून माजोर्डा येथील शॅक्सना फटका बसला आहे.

शिवोलीत हणजूण पोलिसांची छापेमारी; ड्रग्जसह कॅमेरुनच्या नागरिकास अटक!

शिवोलीत हणजूण पोलिसांनी छापेमारी करुन 65 हजारांच्या ड्रग्जसह अडीच लाखांची रोकड जप्त केली. संशयित इमॅन्युअल फॉन (वय, वर्ष 40) या कॅमेरुन नागरिकास पोलिसांकडून अटक.

पर्यटन हंगाम सुरु होताच कळंगुटमधील रेस्टॉरंट आणि क्लब व्यवस्थापकांसोबत समन्वय बैठक

उत्तर गोव्याचे एसपी उत्तर अक्षत कौशल, पर्वरीचे एसडीपीओ विश्वेश कर्पे आणि पीआय राहुल परब यांनी कळंगुट पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील क्लब मालक/व्यवस्थापकांशी समन्वय बैठक घेतली.

मुसळधार पावसामुळे पाचवीत शिकणारा शाळकरी मुलगा बुडाला!

अकस्मात आलेल्या धुवांधार पावसामुळे दर्शन नार्वेकर हा ११ वर्षीय मुलगा नाल्याच्या पाण्यात वाहून जाण्याची दुर्घटना आज बुधवारी संध्याकाळी उसगावात घडली. सदर बालक साईनगर तिस्क या भागातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. तिस्क-उसगाव येथील साईनगर परिसरात ही घटना घडली असून ट्यूशनहून परतत असलेल्या या मुलाला नाल्यामध्ये अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो नाला पार करत असताना वाहून गेला. फोंडा येथील अग्निशामक दलाच्या जवानांकडून त्याचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत अविरतपणे सुरू होते. मात्र, सदर बालकाचा शोध लागला नसल्याचे सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cuncolim Industrial Estate: मासळीची वाहने पुन्हा अडवली, असह्य दुर्गंधीने कुंकळ्ळीवासीय हैराण; पोलिसांकडून तपासणी

Dual Citizenship: दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्यावरुन युरी आलेमाव आक्रमक; गोवा भाजपमधील कोणत्याही नेत्याने...

Goa Chief Secretary: मुख्य सचिवांचा बंगला अडचणीत! जमीन खरेदीचा व्यवहार बेकायदेशीर; जनहित याचिकेद्वारे हायकोर्टात आव्हान

‘मेघना’कुठे गेली! गाय-वासरासाठी मालकाच्या जीवाची घालमेल; फोंडा पोलिस ठाण्यात तक्रार

Rashi Bhavishya 17 October 2024: या राशीच्या लोकांनी आज लांबचा प्रवास टाळावा

SCROLL FOR NEXT