राचोल परिसरात मासेमारी जहाजांची बेकायदेशीर पार्किंग व त्यामुळे निर्माण होणाऱ्या कामगार समस्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर गोवा तटीय क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (GCZMA) च्या अधिकाऱ्यांनी नुकतीच या ठिकाणी पाहणी केली. राचोल ग्रामपंचायतीचे सरपंच जोसेफ वाझ यांच्या लेखी तक्रारीनंतर ही पाहणी करण्यात आली.
हवामान विभागाने गोव्यासाठी २४ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. किनारपट्टी भागात समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
गोवा विद्यापीठाने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची ठसा उमठवत राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेकडून (NAAC) A+ ग्रेड मिळवली आहे. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच हा मान मिळाला असून, यामुळे गोवा विद्यापीठ राज्यातच नव्हे, तर देशातही शैक्षणिक क्षेत्रात आपली ओळख अधोरेखित करू लागले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अभिनंदन केलं आहे.
नादोडा पंचायत क्षेत्रातील ‘राण्यांचे जुवें’ बेटावर लवकरच नवीन पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी माती परीक्षणाला एप्रिल २०२५ मध्ये तांत्रिक मंजुरी दिली आहे.
काशीमठ -बांदोडा जवळील सर्व्हिस रोडवर झाडासह दरड काही भाग कोसळला. वाहतुकीवर परिणाम नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे दरड हटविण्याचे काम सुरु.
गोवा विद्यापीठातील उत्तरपत्रिका चोरी प्रकरणी 'गोमन्तक'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर 'एनएसयुआय' आक्रमक. या सर्व प्रकरणांना जबाबदार असलेल्या आणि गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या भवितव्याची कदर नसलेल्या कुलगुरू हरिलाल मेनन यांना तत्काळ निलंबित करण्याची राज्यपाल अाणि शिक्षण सचिवांकडे मागणी.
सिप्ला फाउंडेशनच्या सहकार्याने केपे येथे आदर्श स्कूल सोसायटीच्या (होली क्रॉस स्कूल) नवीन स्कूल बसचे उद्घाटन मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते झाले.
चोडण - रायबंदर जलमार्गावर नुकत्याच सुरू झालेल्या रो-रो फेरीबोटीत प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडत आहे. विशेष म्हणजे या फेरीबोटीत चोडणवासीय प्रवासी कमी आणि केवळ नव्या फेरीबोटीचा आनंद लुटण्यासाटी गर्दी करणाऱ्यांची गर्दी वाढत आहे.
FC Goa: एफसी गोवाच्या जर्सीत 'हर्ष पत्रे'
गोमंतकीय प्रतिभावान फुटबॉल मध्यरक्षक हर्ष पत्रे आगामी २०२५-२६ मोसमात एफसी गोवा संघाच्या जर्सीत खेळताना दिसेल. या २२ वर्षीय खेळाडूला करारबद्ध करण्यासाठी संघाला सात वर्षे वाट पाहावी लागली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.