Live Updates

Goa Live Updates: गोव्यात ATS आणि NSG च्या विशेष दहशतवादविरोधी सरावाची यशस्वी सांगता!

Goa News Updates: गोव्यातील ताज्या घडामोडी.

Manish Jadhav

गोव्यात ATS आणि NSG च्या विशेष दहशतवादविरोधी सरावाचा यशस्वी सांगता!

गोवा पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि देशातील विशेष दहशतवादविरोधी बल, नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स (NSG) यांनी संयुक्तरित्या गोव्यातील महत्त्वपूर्ण ठिकाणी उच्च दर्जाचे दहशतवादविरोधी सराव घेतले. गोवा राज्य केंद्रीय ग्रंथालय, बोम जिझस बॅसिलिका, सॅ कॅथेड्रल आणि डबलट्री बाय हिल्टन यांसारख्या ठिकाणी 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान या सरावाचे आयोजन करण्यात आले होते.

कळंगुटमधील बेकायदेशीर बांधकाम होणार जमीनदोस्त

बार्देश ममलतदार कार्यालयाकडून आलेल्या मागणीनुसार कळंगुटमधील मालमत्ता सर्वे क्र. 205/1 वर असलेल्या बेकायदेशीर बांधकामावर 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता कारवाई केली जाणार आहे. सदर बेकायदेशीर बांधकाम भूपिंदर सिंह आउलख आणि कुलविंदर सिंह आउलख (स्व. सुखदेव सिंह यांचे उत्तराधिकारी) यांच्या मालकीचे आहे. उत्तर गोवा उपविभागीय दंडाधिकारी राजेश एस. आजगावकर यांनी ही कारवाई करण्याचे आदेश दिले असून, या कारवाईसाठी पोलिस संरक्षणासह संपूर्ण पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे.

कळसा-भांडुरा विषयी म्हादई प्राधिकरणाची बैठक; केंद्राचा सल्ला घेण्याचं ठरलं!

कळसा-भांडुरा विषयी म्हादई प्राधिकरणाची बैठक पर्वरी कार्यालयात पार पडली. यावेळी कळसा-भांडुरा पाहणी संदर्भात केंद्र सरकारचा सल्ला (Legal Advice) घेण्यात येण्याचे ठरले. या बैठकीत जल संसाधन खात्याचे सचिव आय एस अधिकारी सरप्रितसिंह गील यांच्या ऐवजी आय एस अधिकारी संजित रोड्रिगिस उपस्थिती लावली.

प्रवाह प्राधिकरणाच्या बैठकीस गोव्याचे प्रतिनिधी अनुपस्थित

म्हादई संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या प्रवाह प्राधिकरणाची म्हाटसा येथे होणाऱ्या बैठकीस गोव्याचे प्रतिनिधित्व करणारे गोवा जलसंसाधन खात्याचे सचिव आयएस अधिकारी सरप्रितसिंह गिल अनुपस्थित. प्रवाहचे अध्यक्ष गोव्यात आले असता गोव्याचे प्रतिनिधी अनुपस्थित राहणे दुर्दैवी- पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर.

केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया गोवा दौऱ्यावर!

केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आज (25 ऑक्टोबर) गोवा दौऱ्यावर. सावंत सरकारमधील मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी त्यांचे मोपा विमानतळावर स्वागत केले.

अश्विन भोबे यांनी घेतली मुंबई हायकोर्टच्या अतिरिक्त न्यायाधीशपदाची शपथ!

अश्विन भोबे यांनी आज (25 ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदाची शपथ घेतली.

काणकोण पोलिसांची धडक कारवाई, उत्तराखंडच्या मनोज कुमारला गांजासह अटक!

काणकोण पोलिसांनी केरी समुद्रकिनाऱ्यावर मनोज कुमार (उत्तराखंड) याला अटक केली. यावेळी त्याच्याकडून 54.5 हजार किमतीचा 109 ग्रॅम गांजा जप्त केला.

लिओना बरेटो यांना धमकावल्याप्रकरणी दिगंबर सावळसह अन्य 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

मडगाव पोलिसांनी माजी उप चॅरिपर्सन दिपाली सावळ यांचे पती दिगंबर सावळ आणि इतर 5 जणांविरुद्ध कारचे नुकसान करुन ॲड लिओना बरेटो यांना धमकावणे याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: फॉरेक्स ट्रेडिंगच्या बहाण्याने 35 लाखांना गंडा लावणारा केरळचा तरुण गजाआड; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

Yuri Alemao: एस्कॉर्ट संकेतस्थळांवरून आलेमाव यांची सरकारवर घणाघाती टीका! पोलिसांनी फेटाळला आरोप

CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांचा धडाका! आदिवासी कल्याणच्या कामगिरीचा घेतला आढावा

IRONMAN 70.3: रविवारपासून गोव्यात रंगणार 'आयर्नमॅन'चा थरार! 50 जीवरक्षक, AI रोबोट्सच्या साहाय्याने दृष्टी ठेवणार 'नजर'

Karnataka Tourism Policy: कर्नाटकची गोव्याला टक्कर! किनाऱ्यांवर शॅक उभारण्यास सरकारची परवानगी; दारु विक्रीचाही मिळणार परवाना

SCROLL FOR NEXT