Mohammed Siraj Angry at Steve Smith
Mohammed Siraj Angry at Steve Smith Dainik Gomantak
क्रीडा

WTC 2023 Final: सिराज भडकला, थेट स्मिथच्या दिशेने बॉल फेकला; चालू सामन्यात नेमकं काय झालं?

Pranali Kodre

Mohammed Siraj Angry at Steve Smith: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना सुरु झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शतके केली. दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्मिथ आणि भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यात चकमक झाल्याचे पाहायला मिळाले.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवसाखेर 85 षटकात 3 बाद 327 धावा केल्या होत्या. त्यावेळी स्मिथ 95 धावांवर आणि हेड 146 धावांवर नाबाद होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्याच षटकात दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर स्मिथने दोन सलग चौकार ठोकत त्याचे 31 वे कसोटी शतक पूर्ण केले.

पण त्यानंतर पुढच्या चेंडूपूर्वी स्मिथ आणि सिराज यांच्याच शाब्दिक चकमक झाल्याचे दिसले. डावातील 86 व्या षटकातील चौथा चेंडू सिराज टाकण्यासाठी येत असताना अचानक स्मिथ मागे सरकला. त्यामुळे सिराजही रनअप पूर्ण करून थांबला.

पण स्मिथने अचानक मागे सरकण्याचा निर्णय घेतल्याने तो वैतागलेला दिसला. त्याने त्याच्या हातातील चेंडू थेट स्ट्रायकर एन्डला फेकला. पण त्यावेळी स्मिथ त्याला त्याच्या मागे सरकण्याचे कारण सांगतानाही दिसला.

स्पायडर कॅमेऱ्यामुळे त्याला खेळण्यात अडचण येत असल्याने तो मागे सरकल्याचे स्मिथ सांगत होता. त्यानंतर चिडलेला सिराज त्याला काहीतरी बोलून पुन्हा गोलंदाजीसाठी जाताना दिसला. पण त्यानंतर सिराजने चांगला चेंडू टाकला, ज्यावर स्मिथला धाव काढता आली नाही.

दरम्यान, नंतर हेडनेही त्याचे दीशतक पूर्ण केले. पण स्मिथ आणि हेड नंतर फार काळ टिकू शकले नाहीत. 92 व्या षटकात हेडला सिराजने यष्टीरक्षक केएस भरतच्या हातून झेलबाद केले. हेडने 174 चेंडूत 163 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 25 चौकार आणि 1 षटकार मारला.

त्यानंतर 99 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरने स्मिथला त्रिफळाचीत केले. स्मिथने 268 चेंडूत 121 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 19 चौकार मारले.

दरम्यान, या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या पिहल्या सत्राखेरपर्यंत ऑस्ट्रेलियाने हेड आणि स्मिथच्या शतकांच्या जोरावर 109 षटकात 7 बाद 422 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT