Indian Wrestlers at Jantar Mantar
Indian Wrestlers at Jantar Mantar Dainik Gomantak
क्रीडा

Wrestlers Protest: तपास पूर्ण होईपर्यंत बृजभूषण यांना पदापासून दूर राहावे लागणार

दैनिक गोमन्तक

Wrestlers Protest: भारतीय कुस्ती संघ (डब्ल्यूएफआई) चे अध्यक्ष बृजभूषण शरण महिला खेळाडूंसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी कुस्ती खेळाडू आंदोलनास बसले होते. आता या आंदोलनाला यश आल्याचे दिसून येत आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. सरकाराने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक निरिक्षण समिती नेमली आहे. या निरिक्षण समितीला चार आठवड्यात रिपोर्ट देण्यास सांगितले आहे. समितीने दिलेल्या रिपोर्टच्या आधारे अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.केंद्रीय मंत्री अनुराग कश्यप यांनी याबाबत बोलताना सांगितले आहे की ,मी आंदोलनाला बसलेल्या खेळाडूंसोबत बोललो. त्यांनी त्यांच्या मागण्या सांगितल्या आहेत.

त्याचबरोबर,भारतीय कुस्ती संघ (डब्ल्यूएफआई)वर आरोप लावल्यानंतर लगेच आम्ही त्यांना नोटीस पाठवून 72 तासाच्याआत उत्तर देण्यास बजावले होते असेही त्यांनी म्हटले होते. त्याचबरोबर अनुराग कश्यप यांनी असेही म्हटले आहे की ,ही निरिक्षण समिती जोपर्यत आपला निर्णय देणार नाही तोपर्यत भारतीय कुस्ती संघ (डब्ल्यूएफआई) चे अध्यक्ष बृजभूषण शरण पदावर असणार नाहीत. ही समिती बृजभूषण यांच्यावर असलेल्या आरोपांचा तपास करेल असेही त्यांनी म्हटले आहे. हा तपास पुर्ण होईपर्यत निरिक्षण समिती कुस्ती संघाची कामकाज पाहणार आहे.

दरम्यान , कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचार ,वित्तिय अनियमितता, प्राशसनिक बेजबादारपणा असे अनेक आरोप लावले आहेत. केंद्रीयमंत्री अनुराग कश्यप यांच्यासोबत बोलल्यानंतर आम्ही आंदोलन मागे घेत आहोत. आशा करतो की निष्पक्ष पद्धतीने प्रकरणाचा तपास होईल असे बजरंग पुनियाने( Bajrang Puniya) म्हटले आहे. या सगळ्या आरोपांवर बृजभूषण यांनी हे सगळे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

Catholic Wedding: कॅथलिक समाजासाठी विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी; चर्चिल आलेमाव यांची मागणी

Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

कोर्टात 13 महिन्यांच्या बाळाला तिने फरशीवर फेकले, न्यायाधीशही चकित झाले; वाचा नेमकं प्रकरणं

Goa Today's Live News: गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार - मुख्यमंत्री डॉ. सावंत

SCROLL FOR NEXT