Shubman And Shreyas  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: 3000! वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा षटकार मारण्यात 'विश्वविक्रम', इंदूरमध्ये दीड डझन षटकार

टीम इंडियाने ODI मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला आहे (Most Sixes in ODI by Teams).

Manish Jadhav

Most Sixes In ODI by Team: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना (होळकर क्रिकेट स्टेडियम) इंदूर येथे खेळवला जात आहे.

या सामन्यात शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीनंतर सूर्यकुमार यादवच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 399 धावांची विक्रमी धावसंख्या उभारली. या सामन्यात टीम इंडियाने अनेक मोठे विक्रम केले.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3000 षटकार मारण्याचा विश्वविक्रम

टीम इंडियाने (Team India) ODI मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला आहे (Most Sixes in ODI by Teams). एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3000 षटकार मारणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाने एकूण 18 षटकार ठोकले. टीम इंडियाने आता वनडे क्रिकेटमध्ये एकूण 3007 षटकार ठोकले आहेत. त्याचबरोबर, वेस्ट इंडिज (2953) या यादीत दुसऱ्या स्थानावर तर पाकिस्तान (2566) तिसऱ्या स्थानावर आहे.

गिल-अय्यरने झंझावाती शतके झळकावली

गिलने 97 चेंडूत चार षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने 104 धावा केल्या, तर अय्यरने 90 चेंडूत 11 चौकार आणि तीन षटकारांसह 105 धावा केल्या.

या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 200 धावांची भागीदारी केली, जी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये कोणत्याही विकेटसाठी केलेली चौथी सर्वोच्च भागीदारी आहे.

कर्णधार केएल राहुल (38 चेंडूत 52 धावा, तीन चौकार, तीन षटकार) आणि सूर्यकुमार यादव (37 चेंडूत नाबाद 72 धावा, सहा चौकार, सहा षटकार) यांनी अर्धशतकं झळकावून भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात महत्त्वाचं योगदान दिलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची (India) ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी, 2013 मध्ये भारताने बंगळुरुमध्ये सहा विकेट्सवर 383 धावा केल्या होत्या.

जोश हेझलवुड किफायतशीर गोलंदाज ठरला

ऑस्ट्रेलियासाठी कॅमेरुन ग्रीन हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. शॉन अॅबॉटने त्याच्या 10 च्या कोट्यात 91 धावा दिल्या, तर जोश हेझलवूड सर्वात किफायतशीर ठरला. त्याने 10 षटकात 62 धावा देत ऋतुराज गायकवाडची विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळवारचा दिवस महाशुभयोगाचा! 'या' 5 भाग्यवान राशींवर राहणार बजरंगबलीची कृपादृष्टी, धनालाभासह मिळणार नशिबाचीही साथ

Viral Video: धावत्या ट्रेनला लटकून स्टंटबाजी! 'हीरो' बनणाऱ्या पठ्ठ्याची मोडली खोड; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, 'बरं झालं...'

Santa Cruz Bogus Voters: निवडणूक आयोगाविरोधात गोव्यातही काँग्रेसचा एल्गार! सांताक्रुझ मतदारसंघात 3 हजार बोगस मतदार

AUS vs SA: टी-20 मध्ये ग्लेन मॅक्सवेल पुन्हा रचणार इतिहास! 'या' एलिट खेळाडूंच्या यादीत होणार सामील; घ्याव्या लागणार फक्त 'इतक्या' विकेट्स

Goa Tribal Reservation Bill: आदिवासींसाठी 'सोनियाचा दिनु', राजकीय आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर; अनेक वर्षांच्या लढ्याला यश

SCROLL FOR NEXT