Sara Tendulkar Deepfake Image Dainik Gomantak
क्रीडा

Sara Tendulkar Deepfake Image: सारा तेंडुलकर देखील डीपफेकची शिकार; इन्स्टा स्टोरी पोस्ट करत व्यक्त केला संताप

Sara Tendulkar: नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषकाच्या वेळी सारा भारताचे सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती.

Manish Jadhav

Sara Tendulkar Deepfake Image: महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या डीपफेक फोटोंवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. साराने इंस्टाग्राम पोस्टद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषकाच्या वेळी सारा भारताचे सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. गेल्या काही काळापासून सारा तेंडुलकरचे नाव शुभमन गिलसोबत जोडले जात आहे आणि अलीकडेच तिचा गिलसोबतचा डीपफेक फोटोही व्हायरल झाला होता, ज्यामुळे सारा अस्वस्थ दिसत होती.

जाणून घ्या काय म्हणाली सारा तेंडुलकर

नुकताच शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमध्ये सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar) शुभमन गिलला मिठीत घेतलेले दिसत आहे. हा एक डीपफेक फोटो होता, जो एआय टूलच्या मदतीने सारा तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकरचा फोटो डीपफेक करुन तयार करण्यात आला होता.

यावरुन बराच गदारोळ झाला होता. आता सारा तेंडुलकरने या डीपफेक फोटोवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

लोकांची दिशाभूल केली जात आहे

सारा म्हणाली की, 'सोशल मीडिया (Social Media) हे आपल्या सर्वांसाठी आनंद, दुःख आणि दैनंदिन गोष्टींबद्दल व्यक्त होण्याचं एक उत्तम ठिकाण आहे. तथापि, तंत्रज्ञानाचा गैरवापर ही चिंताजनक बाब आहे, कारण ते इंटरनेटची सत्यता आणि प्रामाणिकता हिरावून घेते.

ती पुढे म्हणाले की, मी असे फोटो पाहिले, जे वास्तवापासून खूप दूर आहे. X सोशल मीडिया हँडलवरील काही अकाऊंट्स जे खरे असल्याचा दावा करतात ती खोटी आहेत.

लोकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने अशी अकाऊंट्स तयार करण्यात आली आहेत. माझे X वर कोणतेही अकाऊंट्स नाही आणि मला आशा आहे की X ने अशा अकाऊंट्सवर तात्काळ कारवाई करावी.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT