Sam Curran with Girlfriend
Sam Curran with Girlfriend  Dainik Gomantak
क्रीडा

IPL Auction 2023: 'गर्लफ्रेंडच्या वडिलांसोबत...' सॅम करनने सांगितला लिलावादरम्यानचा अनुभव

Pranali Kodre

Sam Curran: इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगामाच्या लिलाव शुक्रवारी कोचीमध्ये झाला. या लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करन सर्वात महागडा क्रिकेटपटू ठरला. त्याला पंजाब किंग्सने 18.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. दरम्यान, त्याने लिलावादरम्यान कशी परिस्थिती होती, याबद्दल खुलासा केला आहे.

सॅम करनसाठी या लिलावात मुंबई इंडियन्स, लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स असे अनेक संघ उत्सुक होते. मात्र, अखेर त्याच्यावर 18.50 कोटींची बोली लावत पंजाब किंग्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतले. त्यामुळे तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातीलच सर्वात महागडा क्रिकेटपटू ठरला.

(Sam Curran watching IPL auction with his girlfriend)

दरम्यान, लिलावावेळी कशी अवस्था होती याबद्दल सॅम करनने स्टार स्पोर्ट्सच्या शोमध्ये सांगितले की 'मी आदल्या रात्री झोपूही शकलो नव्हतो. लिलाव कसा होईल म्हणून थोडा उत्साहात होतो आणि थोडा नर्वसही होतो. पण मी खूप खूष आहे की मला एवढ्या किंमतीत खरेदी केले गेले. मला एवढ्या किंमतीची अपेक्षा नव्हती.'

तो पुढे म्हणाला, 'नक्कीच जिथून आयपीएलची सुरुवात झालेली, त्याच संघात परत जाणे शानदार आहे. याच संघाकडून मी आयपीएल पदार्पण केले होते. त्या संघात आता मी काही इंग्लंडच्या संघसकाऱ्यांबरोबरही राहिल.'

सॅम करन त्याचा पहिला आयपीएल हंगाम 2019 साली पंजाब किंग्स संघाकडूनच खेळला होता. त्यावेळी त्याने हॅट्रिकही घेतली होती.

इंग्लंडच्या या 24 वर्षीय अष्टपैलूने लिलाव गर्लफ्रेंडबरोबर पाहिल्याचेही सांगितले. तो म्हणाला, 'मी लिलाव पाहाण्यासाठी संघर्ष करत होतो, कारण मला तो कुठे लाईव्ह दिसत आहे, हे माहित नव्हते. इंग्लंडमध्ये लिलाव टीव्हीवर दिसत नव्हता. त्यानंतर मला कोणीतरी लिंक पाठवली. मी माझी गर्लफ्रेंड आणि तिच्या वडिलांबरोबर बसून लिलाव पाहिला.'

सॅम करनच्या गर्लफ्रेंडचे नाव इसाबेल सायमंड विलमॉट आहे. सॅम आणि इसाबेल गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT