Rishabh Pant
Rishabh Pant Dainik Gomantak
क्रीडा

Rishabh Pant: ऋषभ पंतच्या पुनरागमनावर मोठी अपडेट! चाहत्यांची होणार निराशा

Manish Jadhav

Rishabh Pant Health Update: टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. 30 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या कार अपघातात ऋषभ गंभीर जखमी झाला.

या अपघातामुळे तो आयपीएल 2023 मधूनही बाहेर पडला आहे, अशा परिस्थितीत चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की, तो मैदानात परत कधी येणार. ऋषभ पंतच्या पुनरागमनावर भारताच्या माजी कर्णधाराने मोठे वक्तव्य केले आहे.

ऋषभ पंतच्या पुनरागमनाची मोठी बातमी आली आहे

आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांच्यासाठी सर्वात कठीण आव्हानांपैकी एक म्हणजे ऋषभ पंतची जागा भरुन काढणे आहे. जो नुकताच एका भीषण अपघात आणि शस्त्रक्रियेनंतर अनुपलब्ध झाला आहे.

सौरव गांगुली म्हणाला की, 'मी त्याच्याशी अनेकदा बोललो. दुखापती आणि शस्त्रक्रियांनंतर तो साहजिकच कठीण काळातून जात आहे. मी त्याला शुभेच्छा देतो. वर्षभरात किंवा काही वर्षांत तो पुन्हा भारताकडून खेळेल.'

पंतच्या बदलीची घोषणा अद्याप व्हायची आहे

पंतला आयपीएल (IPL) दरम्यान काही काळ संघासोबत बघायला आवडेल का जेणेकरुन तो त्याच्या रिकव्हरीमध्येही मदत करु शकेल? गांगुली पुढे म्हणाला की, 'माहित नाही. आपण बघू.' दिल्ली संघाने अद्याप पंतच्या बदलीची घोषणा केलेली नाही.

तरुण अभिषेक पोरेल आणि अनुभवी शेल्डन जॅक्सन यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे, हे गांगुलीने अद्याप ठरवलेले नाही. डेव्हिड वॉर्नरकडे संघाची कमान सोपवली जाण्याची शक्यता आहे, तर अक्षर पटेल या हंगामात उपकर्णधार असेल.

दिल्ली कॅपिटल्सने तयारी सुरु केली

गांगुलीच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता येथे तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये पृथ्वी शॉ, इशांत शर्मा, चेतन साकारिया, मनीष पांडे आणि इतर देशांतर्गत खेळाडू सहभागी झाले होते.

सौरव गांगुली म्हणाला की, 'आयपीएलला अजून एक महिना बाकी आहे आणि हंगाम नुकताच सुरु झाला आहे. ते जेवढे क्रिकेट खेळतात ते लक्षात घेता सर्व खेळाडूंना एकत्र आणणे अवघड आहे. चार-पाच खेळाडू इराणी ट्रॉफी खेळत आहेत. सरफराजच्या बोटाला दुखापत झाली आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT