Prithvi Shaw
Prithvi Shaw Dainik Gomantak
क्रीडा

Prithvi Shaw Attack: पृथ्वी शॉच्या गाडीवर हल्ला, सेल्फी घेण्यास नकार दिल्याने...

Manish Jadhav

Prithvi Shaw Attack: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर पृथ्वी शॉच्या गाडीवर मुंबईत हल्ला झाला आहे. शॉ मित्राच्या गाडीत बसला होता. यातच तिथल्या काही लोकांनी त्याच्याकडे सेल्फीसाठी पुन्हा-पुन्हा मागणी केली. मात्र त्याने नकार दिल्याने त्यांनी संतप्त होऊन कारवर हल्ला केला. या हल्ल्याचा आठ जणांवर आरोप आहे.

दरम्यान, पृथ्वी शॉवरील (Prithvi Shaw) हल्ल्याप्रकरणी 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. जेव्हा पृथ्वी शॉने दुसऱ्यांदा सेल्फी घेण्यास नकार दिला तेव्हा त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. दोषींना सोडले जाणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.

हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला

पृथ्वी शॉवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी (Police) एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरच्या प्रतीनुसार, आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम 143, 148, 149, 384, 427, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वी शॉवर बुधवारी दुपारी चारच्या सुमारास हल्ला झाला.

पोलीस आरोपींच्या शोधात गुंतले

क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 8 लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यांना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.

पृथ्वी शॉ हा विस्फोटक फलंदाज आहे

विशेष म्हणजे, पृथ्वी शॉ भारतीय क्रिकेट संघाचा एक भाग आहे. त्याने टीम इंडियासाठी अनेक वेळा सलामी दिली आहे. विशेष म्हणजे, तो त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT