Pakistan Cricket Team Celebration Video
Pakistan Cricket Team Celebration Video Video
क्रीडा

PAK vs SL: 'आम्ही एकत्र जिंकलो...आम्ही एकत्र सेलिब्रेट करू', पाकिस्तानच्या विजयाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल

दैनिक गोमन्तक

पाकिस्तान क्रिकेट संघाने श्रीलंकेवरचा दुसरा सर्वात मोठा विजय (PAK vs SL) केक कापून साजरा केला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 2 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात यजमान श्रीलंकेचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. याच स्टेडियमवर 24 जुलैपासून मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामनाही खेळवला जाणार आहे. (Pakistan Cricket Team Celebration Video)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पाकिस्तानी खेळाडू केक कापून विजय साजरा करताना दिसत आहेत. टेबलवर एक चॉकलेट केक ठेवला आहे, ज्यावर अभिनंदन लिहिलेले आहे. केक कापण्यासाठी कर्णधार बाबर आझम युवा सलामीवीर अब्दुल्ला शफीकला चाकू देताना दिसत आहे. यावेळी सर्व खेळाडू एकमेकांसोबत खूप मस्ती करताना दिसत आहेत. कॅप्टनला आधी केक खाऊ घातला जात आहे. यानंतर सर्व खेळाडू केकचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

PCB ने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, 'Together we win... चला एकत्र सेलिब्रेट करूया, बॉईज केक टाईम.' असे लिहिले आहे. पाकिस्तानी खेळाडूंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांना तो खूप आवडला आहे. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, युवा फलंदाज अब्दुल्ला शफीकने पाकिस्तानसाठी दुसऱ्या डावात नाबाद 160 धावांची खेळी केली. बाबर आझमने पहिल्या डावात शानदार शतक झळकावले. पाकिस्तानसमोर 342 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी 6 गडी गमावून पूर्ण केले.

22 वर्षीय अब्दुल्लाने नाबाद 160 धावांची खेळी खेळली

22 वर्षीय उजव्या हाताचा फलंदाज अब्दुल्ला शफीकने विजयानंतर कर्णधार बाबर आझमचे कौतुक केले. दुसऱ्या डावात शफीकने सलामीवीर इमाम-उल-हकच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर बाबरसह त्याने तिसऱ्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी केली. बाबर बाद झाल्यानंतर शफीकने मोहम्मद रिझवानसोबत 71 धावांची भागीदारी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT