ipl
ipl  Dainik Gomantak
क्रीडा

CSA T20 League: दक्षिण आफ्रिकेत होणार मिनी IPL; MI, CSK, DC संघ घेणार भाग

दैनिक गोमन्तक

South Africa T20 league: आयपीएलच्या 10 पैकी सहा संघांच्या मालकांनी दक्षिण आफ्रिकेच्या नवीन T20 लीगमध्ये संघ विकत घेण्याचा निर्णय घेतल्याने आयपीएलचा ठसा जगभरात पसरत आहे. ही लीग जानेवारी-फेब्रुवारी 2023 मध्ये सुरू होणार आहे. अहवालानुसार, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या मालकाने दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये संघ खरेदी करण्यासाठी यशस्वी बोली लावली आहे.(CSA T20 League)

ही लीग क्रिकेट दक्षिण आफ्रिका त्यांच्या भागीदार सुपरस्पोर्टच्या सहकार्याने चालवली जाईल. आयपीएलमधील सुपर किंग्ज संघाचा मालक असलेल्या चेन्नई सुपर किंग्स स्पोर्ट्स लिमिटेडने सर्वाधिक बोली लावणारा म्हणून जोहान्सबर्ग फ्रँचायझी जिंकल्याचे कळते. मुंबईचे मालक केपटाऊन तर सनरायझर्स सन टीव्ही ग्रुपने पोर्ट एलिझाबेथ संघ विकत घेतला आहे. गेल्या वर्षी विक्रमी बोली लावून लखनऊचा संघ विकत घेतलेल्या आरपी संजीव गोयंका गटाने डरबन आणि राजस्थान रॉयल्सच्या मालकांनी पार्ल संघ जिंकला आहे.

प्रिटोरियाला जाणारा शेवटचा संघ जिंदाल साऊथ वेस्ट स्पोर्ट्स आहे, ज्याचे नेतृत्व आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक पार्थ जिंदाल करत आहेत. सर्व कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघांच्या शहरांची अधिकृत घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. मंगळवारी एक निवेदन जारी करून बोर्डाने सांगितले की, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ या टी-20 लीगचा संचालक असेल.

स्मिथ म्हणाला, 'या नव्या स्पर्धेचे नेतृत्व करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आल्याचा मला अभिमान आहे. मी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटसाठी वचनबद्ध आहे आणि खेळाची सेवा करण्यास तयार आहे. मला विश्वास आहे की ही नवीन लीग खेळामध्ये आवश्यक असलेली गुंतवणूक आणेल आणि जगभरातील आणि आपल्या देशाच्या प्रतिभावान खेळाडूंना नवीन संधी उपलब्ध करून देईल.आतापर्यंत भागधारकांचा प्रतिसाद खूप सकारात्मक आहे आणि आम्ही सुरुवातीच्या टप्प्यात बरीच प्रगती केली आहे. दक्षिण आफ्रिकन क्रिकेटसाठी एक मौल्यवान, शाश्वत आणि रोमांचक स्पर्धा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT