Kerala Blasters
Kerala Blasters Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: केरळा ब्लास्टर्सची अपराजित घोडदौड;हैदराबादला नमविले

किशोर पेटकर

पणजी : केरळा ब्लास्टर्सने इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात अपराजित घोडदौड राखताना रविवारी हैदराबाद एफसीला (Hyderabad FC) 1-0 फरकाने हरविले. वास्को येथील टिळक मैदानावर झालेल्या लढतीत स्पॅनिश आघाडीपटू अल्वारो वाझकेझ याने पूर्वार्धात नोंदविलेला गोल निर्णायक ठरला.

केरळा ब्लास्टर्स (Kerala Blasters) आता सलग 9 सामने अपराजित आहे. या कालावधीत त्यांनी 4 विजय व 5 बरोबरी नोंदविल्या आहेत. पराभवामुळे हैदराबादची अपराजित मालिका 8 सामन्यांनंतर संपुष्टात आली. केरळा ब्लास्टर्सने 10 लढतीतील चौथा विजय नोंदविला. इव्हान व्हुकोमानोविच यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला 19 नोव्हेंबर 2021 रोजी फातोर्डा येथे एटीके मोहन बागानकडून 4-2 फरकाने पराभव पत्करावा लागला, त्यानंतर केरळच्या संघाने एकही पराभव पत्करलेला नाही.

हैदराबादला स्पर्धेत दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे 10 लढतीनंतर 16 गुण आणि तिसरा क्रमांक कायम राहिला. स्पर्धेत सर्वाधिक 9 गोल केलेल्या बार्थोलोम्यू ओगबेचे याच्यावर केरळा ब्लास्टर्सचा सक्त पहारा राहिला. त्याचा प्रतिकूल परिणाम हैदराबादच्या आक्रमणावरही झाला.

केरळा ब्लास्टर्ससाठी महत्त्वपूर्ण ठरलेला गोल वाझकेझ याने सामन्याच्या 42व्या मिनिटास नोंदविला. सहल अब्दुल समद याच्या असिस्टवर स्पॅनिश आघाडीपटूने हैदराबादच्या बचावपटूस मागे टाकत सणसणीत फटक्यावर गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याला चकविले. तीस वर्षीय अल्वारोचा हा 10 सामन्यातील चौथा गोल ठरला. त्यापूर्वी दोन वेळा कट्टीमनी याने केरळा ब्लास्टर्सचे आक्रमण फोल ठरविले होते. 24व्या मिनिटास त्याने जॉर्जे परेरा डायझ याचे धोकादायक हेडिंग वेळीच उधळून लावले.

केरळा ब्लास्टर्स अव्वल स्थानी

हैदराबादला नमविल्यामुळे केरळा ब्लास्टर्सला आता आयएसएल स्पर्धेच्या गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळाले आहे. त्याचे व मुंबई सिटीचे समान 17 गुण झाले. मात्र गोलसरासरीत सरस ठरल्याने केरला ब्लास्टर्सने (+6) पहिला क्रमांक मिळविताना मुंबई सिटीला (+5) दुसऱ्या स्थानी लोटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT