Team India Dainik Gomantak
क्रीडा

Team India's Next Captain: 'हा' युवा खेळाडू बनणार टीम इंडियाचा पुढील कर्णधार! दिग्गज क्रिकेटरने केली भविष्यवाणी

Manish Jadhav

Team India's Next Captain: आयपीएल ही एक अशी लीग आहे, ज्याने जगाला मोठे स्टार क्रिकेटर्स दिले आहेत. आयपीएलमधूनच टीम इंडियाला अनेक स्टार्स मिळाले आहेत.

दरम्यान, न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसनने टीम इंडियाच्या एका युवा खेळाडूची निवड केली आहे, जो आगामी काळात रोहित शर्माच्या जागी भारतीय संघाची धुरा सांभाळू शकतो. हा खेळाडूही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.

केन विल्यमसनने मोठी भविष्यवाणी केली आहे

टीम इंडियाचा (Team India) सलामीवीर शुभमन गिल हा खास खेळाडू असल्याचे सांगताना केन विल्यमसनने भविष्यात भारत आणि गुजरात टायटन्सचे नेतृत्व करण्याची संधी त्याला मिळेल, अशी आशा व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅच्युअर झाल्यानंतर ही जबाबदारी त्याला मिळेल, असेही विल्यमसन म्हणाला.

तसेच, विल्यमसनच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघ 2018 च्या मोसमात अंतिम फेरीत पोहोचला होता.

मात्र, गेल्या मोसमातील खराब कामगिरीनंतर फ्रँचायझीने त्याला संघातून वगळले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याने राष्ट्रीय संघाचे कर्णधारपदही सोडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT