Jamshedpur FC player Valskis 'challenging for East Bengal'
Jamshedpur FC player Valskis 'challenging for East Bengal' 
क्रीडा

'जमशेदपूर एफसी'चा व्हॅल्सकिस 'ईस्ट बंगालसाठी' आव्हानात्मक

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी :  जमशेदपूर एफसीच्या नेरियूस व्हॅल्सकिस याने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात जबरदस्त झंझावात राखताना पाच गोल नोंदविले आहे. आज वास्को येथील टिळक मैदानावर खेळताना ईस्ट बंगालसमोर लिथुआनियाच्या या ३३ वर्षीय आघाडीपटूचा मोठा धोका असेल.


यंदा आयएसएलमध्ये पदार्पण करणाऱ्या ईस्ट बंगालची प्रतिष्ठा पणास लागली आहे. शतकी परंपरा असलेल्या कोलकात्याच्या या संघाच्या मोहिमेची सुरवात नामुष्कीजनक ठरली आहे. इंग्लंडच्या रॉबी फावलर यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने तिन्ही सामने गमावले असून त्यांना २७० मिनिटांच्या खेळात एकही गोल नोंदविता आलेला नाही. त्यांनी तब्बल सात गोल स्वीकारले आहेत. ‘‘आम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. जमशेदपूरविरुद्धचा सामना कठीण असेल, त्यामुळे आम्हाला प्रयत्न करून प्रगती साधावी लागेल. कामगिरीनुसार आम्ही खूप वाईट खेळलो नाही. निकाल आमच्या विरोधात गेले,’’ अशी प्रतिक्रिया फावलर यांनी दिली.

नेरियूस व्हॅल्सकिसचा धडाका...

  •  
  •   आयएसएलमध्ये गतमोसमात चेन्नईयीन सिटीचे प्रतिनिधित्व
  •   २०१९-२० मोसमातील २० सामन्यांत १५ गोलसह गोल्डन बूटचा मान
  •   यंदा ४ सामन्यांत ५ गोल, २ सामन्यांत प्रत्येकी २ गोल
  •   ४ सामन्यांत एकूण ७ शॉट ऑन टार्गेट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT