IPL 2022 PlayOff
IPL 2022 PlayOff Dainik Gomantak
क्रीडा

Qualifier-1 मध्ये RR विरुद्ध GT लढत, या 3 खेळाडूंवर असेल नजर

दैनिक गोमन्तक

IPL 2022 PlayOff : IPL 2022 च्या मोसमात प्लेऑफ खेळण्यासाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. गुजरात टायटन्स (GT), राजस्थान रॉयल्स (RR), लखनऊ सुपर जॉइंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) या मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत.

24 मे रोजी संध्याकाळी राजस्थान रॉयल्सचा सामना गुजरात टायटन्सबरोबर क्वालिफायर-1 मध्ये होईल. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. याआधी या मोसमाचे सामने मुंबई आणि पुण्यात झाले आहेत.

आता क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटर सामने हे कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवले जाणार आहेत. तर क्वालिफायर-2आणि फायनल अहमदाबादमध्ये खेळवली जाईल. लीग सामन्यांनंतर, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स गुणतालिकेत अव्वल, तर राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर आहे. खाली असे काही खेळाडू आहेत जे क्वालिफायर-1 मध्ये आपापल्या संघांसाठी ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतात.

रवी अश्विन

राजस्थान रॉयल्सच्या या खेळाडूने गेल्या काही वर्षांत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाबतीत उत्तम कामगिरी केली आहे. याच कारणामुळे रवी अश्विनला 'मॉडर्न ग्रेट' म्हटले जाते. या हंगामात रवी अश्विन आणि युझवेंद्र चहल या फिरकी जोडीने फलंदाजांना खूप त्रास दिला आहे.

त्याने या मोसमात राजस्थान रॉयल्ससाठी अनेक सामन्यांमध्ये शीर्ष क्रमाने फलंदाजी केली आहे. अश्विनने या मोसमात आतापर्यंत 183 धावा केल्या आहेत.

मॅथ्यू वेड

ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडसाठी आतापर्यंतचा हा मोसम चांगला गेला नाही. या मोसमात तो सातत्याने संघात आणि बाहेर असतो. या हंगामात वेडने गुजरात टायटन्ससाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे.

वास्तविक, मॅथ्यू वेडची गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकातही खराब कामगिरी झाली होती, मात्र उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान वेडने शाहीन आफ्रिदीच्या केवळ 1 षटकात सामना बदलून टाकला. अशा स्थितीत गुजरात टायटन्सलाही या महत्त्वाच्या सामन्यात वेडकडून चांगल्या कामगिरीची आशा असेल.

यशस्वी जैस्वाल

राजस्थान रॉयल्ससाठी हा हंगाम चांगला गेला आहे. पहिल्या काही सामन्यांमध्ये जयस्वालला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही, पण जेव्हा त्याला खेळण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने चमकदार कामगिरी केली.

त्याने गेल्या 4 सामन्यात 187 धावा केल्या आहेत. वास्तविक, राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर योग्य वेळी फॉर्ममध्ये परतला आहे. राजस्थान रॉयल्सचा दुसरा सलामीवीर जोस बटलर उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.

अशा स्थितीत जयस्वाल-बटलर ही सलामीची जोडी अवघ्या काही षटकांत सामना राजस्थान रॉयल्सकडे वळवू शकते. या डाव्या हाताच्या फलंदाजाने अनेक फलंदाजांना दाखवून दिले आहे की त्याच्यात मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT