KL Rahul
KL Rahul Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: पंजाब नव्हे तर 'या' संघाचा के.एल होणार कॅप्टन !

दैनिक गोमन्तक

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) नव्या हंगामापूर्वी बरेच मोठे बदल दिसून येतील अशा शक्यता वर्तविण्यात येत आहेत. मेगा लिलावापूर्वी संघांना फक्त काहीच खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी असणार आहे. याशिवाय काही खेळाडू इतर संघांसोबतही सामील होऊ शकतात. दरम्यान, केएल राहुलशी (KL Rahul) संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे, ज्यामध्ये लोकेश राहुल आयपीएलच्या नव्या संघाचे कर्णधारपद भूषवताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

आयपीएल 2022 च्या हंगामात आता आठ नाही तर दहा संघ दिसणार आहेत. लखनौ आणि अहमदाबादला (Ahmedabad) आयपीएलच्या नवीन संघांचे यजमानपद मिळाले असून या दोन शहरांतील संघ आयपीएलच्या 15 व्या हंगामात खेळणार आहेत. यापैकी एका संघाचे नेतृत्व केएल राहुल करु शकतो. वृत्तानुसार, केएल राहुलला लखनौच्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते, कारण तो पंजाब किंग्जसोबतची (Punjab Kings) भागीदारी संपुष्टात येत आहे.

दोन वर्षे पंजाबचे कर्णधार

केएल राहुल गेल्या अनेक सत्रांपासून पंजाब किंग्जकडून खेळत आहे. गेल्या दोन मोसमात तो संघाचा कर्णधारही होता, परंतु तो संघाला प्लेऑफसाठी पात्र ठरु शकला नव्हता. पंजाब किंग्सने त्याला 11 कोटी रुपयांच्या रकमेसाठी कायम ठेवले होते, परंतु आता त्याला पंजाब किंग्जसोबत राहायचे नाही. अशा स्थितीत पंजाब किंग्जला आपला नवा कर्णधार शोधावा लागणार आहे, तर लखनौ (Lucknow) संघाला अनुभवी कर्णधाराची गरज आहे.

IPL 2022 मेगा लिलावाच्या पूलमध्ये जाण्यापूर्वी दोन नवीन संघांना खेळाडू निवडण्याची संधी आहे. लखनौ आणि अहमदाबादचे संघ त्यांच्यासोबत दोन भारतीय आणि एक विदेशी खेळाडू जोडू शकतात. या अंतर्गत लखनौचा संघ केएल राहुलला आपल्यासोबत घेणार असून त्याला कर्णधारपदाची संधीही देण्यात येईल असही सांगण्यात येत आहे. तीन वर्षांच्या कालावधीनंतर मेगा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत केएल राहुल पुढील तीन वर्षांसाठी लखनौच्या संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

SCROLL FOR NEXT