Pat Cummins - Rohit Sharma | India vs Australia | World Cup 2023 Final ICC
क्रीडा

World Cup 2023: विजेता ऑस्ट्रेलिया अन् उपविजेता भारतीय संघ मालामाल! अन्य 8 संघांवरही ICC कडून बक्षीसाचा वर्षाव

World Cup 2023 Prize Money: वर्ल्डकप 2023 स्पर्धेनंतर आयसीसीकडून सर्व 10 संघांवर मोठ्या रकमेच्या बक्षीसांची उधळण करण्यात आली आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Australia Final, Prize Money:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी (19 नोव्हेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात अंतिम सामना झाला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला हा सामना ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने जिंकत सहाव्यांदा वर्ल्डकप विजयावर नाव कोरले.

दरम्यान, या सामन्यानंतर विजेत्या ऑस्ट्रेलिया आणि उपविजेत्या भारतीय संघाला आयसीसीकडून मोठी रकमेचे बक्षीस मिळाले आहे. इतकेच नाही, तर या वर्ल्डकपमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांना आयसीसीकडून बक्षीस रक्कम मिळाली आहे.

आयसीसीने यंदाच्या वनडे वर्ल्डकपसाठी 10 मिलियन अमेरिकन डॉलरची (भारतीय चलनानुसार साधारण 84 कोटी रुपये) बक्षीस म्हणून तरतुद केली होती.

या 10 मिलियन अमेरिकन डॉलरपैकी 4 मिलियन (साधारण 33 कोटी रुपये) विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला मिळाले आहेत. तसेच उपविजेत्या भारतीय संघाला 2 मिलियन अमेरिकन डॉलर (सारारण 16.5 कोटी रुपये) मिळाले आहेत.

अन्य 8 संघांनाही बक्षीस

याशिवाय उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघांना प्रत्येकी 800,000 अमेरिकन डॉलर (साधारण 6 कोटी 64 लाख रुपये) मिळाले आहेत.

इतकेच नाही तर साखळी फेरीत प्रत्येक सामना जिंकल्यानंतर संघाना 40,000 अमेरिकन डॉलर (33 लाख रुपये) रुपये मिळाले आहेत. म्हणजेच या स्पर्धेत साखळी फेरीत एकूण 45 सामने होणार आहेत. त्यामुळे 45 सामन्यांच्या 45 विजेत्यांना मिळून 1,800,000 अमेरिकन डॉलरचे वाटप करण्यात येणार आहे.

म्हणजेच या स्पर्धेत भारताने सर्व 9 साखळी सामने जिंकले होते. त्यामुळे भारताला 3,60,000 अमेरिकन डॉलर मिळाले.

त्याचबरोबर ज्या 6 संघांचे साखळी फेरीनंतर वर्ल्डकपमधील आव्हान संपले, त्यांना या फेरीनंतर प्रत्येकी 100,000 अमेरिकन डॉलर (83 लाख रुपये) मिळाले. म्हणजेच एकूण 600,000 अमेरिकन डॉलर बक्षीस रकमेचे वाटप करण्यात आले. हे सर्व बक्षीस रक्कम मिळून 10 मिलियन डॉलर इतकी होत आहे.

महिला संघांनाही समान वाटप

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आयसीसीने यापूर्वीच घोषित केल्याप्रमाणे 2025 साली होणाऱ्या महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठीही पुरुषांच्या 2023 वनडे वर्ल्डकपप्रमाणेच समान बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benaulim: बाणावलीची जागा काँग्रेसच लढणार; निंबाळकरांनी विधानसभा निवडणुकीबाबत केले मोठे विधान

Goa Crime: वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथा आरोपी अटकेत; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Goa Live Updates: वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश

Blitz Chess Tournament: ब्लिट्झ स्पर्धेत एथन वाझचा डंका! पुन्हा अपराजित कामगिरी

CM Pramod Sawant: युवकांनी FIT INDIA साठी एकत्र यावे; साखळी युवा उत्सव उद्‌घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT